Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
राज्य कला प्रदर्शनात कोल्हापुरातील चित्रकारांच्या कलाकृतींची निवडज्ञानवत्सल स्वामींचे प्रेरणादायी भाषण, भारावलेले विद्यार्थी अन् जीवनात सफल होण्याचा सक्सेस मंत्रामहापालिकेतील अधीक्षक विलास साळोखेना लाच घेताना अटक करवीर पंचायत समितीवर महायुतीचा झेंडा ! सभापतिपदी राष्ट्रवादीचे साताप्पा पाटील, उपसभापतिपदी भाजपच्या दिपाली पाटील वालावलकर हायस्कूलचे शिक्षक राजेंद्र बनसोडे यांना  जाहीरगोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफांचा गडहिंग्लजमध्ये सत्कारअनुसूचित जाती आरक्षण बचाव समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत वेदा माळीला शंभरपैकी शंभर गुण, देशात अव्वल नगरसेविका, महिला अधिकारी क्रिकेटच्या मैदानावर! शिक्षिकेनही लुटला खेळाचा आनंद ! !महापालिकेतील रिक्त जागांच्या भरतीप्रश्नी काँग्रेस आक्रमक, गुरुवारपासून साखळी उपोषण

जाहिरात

 

डीवाय पाटील कृषी- तंत्र विद्यापीठाच्या प्रकुलपतीपदी ऋतुराज पाटील

schedule19 Jan 26 person by visibility 155 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील तळसंदे  येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापिठाच्या प्रकुलपतीपदी ऋतुराज संजय पाटील यांची नियुक्ती करत असल्याची घोषणा कुलपती डाॅ. संजय पाटील यांनी केली.

तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या तिसऱ्या दीक्षांत समारंभात डाॅ. पाटील यांनी ही घोषणा केली. डॉ. पाटील म्हणाले,  विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी २०१७ पासून डी. वाय. समुहामध्ये जबादारी स्वीकारून डेव्हलपमेंट केली. त्यावेळी ४ हजार विद्यार्थी संख्या आता १६  हजारावर पोहचली आहे.  तळसंदे येथे कृषी  विद्यापिठ सुरू करण्यासाठीही त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. तीन वर्षात हे विद्यापिठाला देशभरात नाव पोहचवले. यामुळे आता त्यांच्यावर विद्यापिठाची जबाबदारी देत आहे.  

 यावेळी आई  वैजयंती पाटील,  संजय किर्लोसकर, वृषाली पृथ्वीराज पाटील, पुजा पाटील,  देवश्री पाटील, तेजस पाटील, डॉ. अनिलकुमार गुप्ता, डॉ. जे. ए. खोत, विलास शिंदे, भावित नाईक यांनी त्यांचे अभिनंदन केले. विश्वस्त ऋतुराज पाटील म्हणाले, २०१७ पासून संस्थेची जबाबदारी सांभाळत आहे‌. या पदामुळे माझी जबाबदारी आणखी जबाबदारी वाढली असून निश्चीतच पदाला साजेसे काम करणार असल्याची ग्वाही दिली

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes