मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानला कोल्हापुरात प्रतिसाद, लोकवर्गणीतून जमली कोट्यवधीची रक्कम
schedule01 Jan 26 person by visibility 15 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ग्रामीण भागाच्या विकासाचे नियोजन करणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू केले आहे. या अभियानला येत्या ३१ मार्च २०२६ मार्च पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही योजना सरकारी निधी आणि लोकसहभागातून राबवली जातीय. कोल्हापूर जिल्ह्यानं लोक वर्गणीच्या माध्यमातून चार कोटी २१ लाख रुपये या अभियानसाठी दिले आहेत. अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी दिली आहे.
राज्यातील ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देणं आणि त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आगस्ट २०२५ पासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू आहे. तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना अभियानच्या माध्यमातून मोठा निधी मिळतो. कोल्हापूर जिल्ह्यातील ५३१ ग्रामपंचायतींमध्ये दोन हजार ४३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. ४५८ ग्रामपंचायतींनी ५२३ वनराई बंधारे बांधलेत. ५५६ ग्रामपंचायतची माहिती वेबसाईटवर अपलोड केली आहे. ६३९ ग्रामपंचायती आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून सेवा पुरवित आहेत. १६३ ग्रामपंचायती ५० टक्के कर सवलतीच्या योजनेत सहभागी झाल्या आहेत. १०२६ ग्रामपंचायतींच्या १ हजार ९७५ कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद स्वनिधीतून विमा सुरक्षा कवच दिलेय. मनरेगा अंतर्गत ६६५ गोठे आणि ६०३ विहिरी तयार आहेत. त्याशिवाय १४ हजार ३७५ घरकुल बांधली आहेत. ८५५ ग्रामपंचायत क्षेत्रातून तब्बल 4 कोटी 21 लाख रुपये लोकवर्गणीच्या माध्यमातून जमा झाले आहेत.