श्री गुरु नानक देवजी यांची ५५६ वी जयंती उत्साहात, विचारेमाळ परिसरात विविध कार्यक्रम
schedule05 Nov 25 person by visibility 163 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शीख धर्माचे संस्थापक व पहिले गुरु श्री गुरु नानक देवजी यांची ५५६ वी जयंती विचारेमाळ परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली. अखिल भारतीय शीख समाज, विचारेमाळ तरुण मंडळातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दरम्यान शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी कृती समितीचे संस्थापक डॉ. प्रविण कोडोलीकर यांनी श्री गुरू नानक देवजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी शाहू फाऊंडेशनचे संस्थापक रोहन वाघमारे, विराज सुतार, निखिल मुजुमदार, अभिजीत खाबडे, कुलजीतसिंग, शेरसिंग, लखनसिंग, रोहितसिंग, रघुवीरसिंग, रॉकीसिंग, बलवीसिंग, सरजीतसिंग, रघुवीरसिंग, मनप्रीतसिंग, जसबीरसिंग, रोहनसिंग, मनमितसिंग, गुरु वीरसिंग, सुनीलसिंग, हरदीपसिंग आणि राजबीरसिंग उपस्थित होते.