योगिता कोडोलीकरसह चार नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
schedule04 Nov 25 person by visibility 188 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर महापालिकेच्या चार माजी नगरसेवकासह प्रयोदी फाउंडेशनच्या अध्यक्ष योगिता कोडोलीकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, मंत्री माणिकराव कोकाटे, राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर, माजी आमदार राजेश पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुरलेकर, शहराध्यक्ष आदिल फरास यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा झाला. यावेळी माजी नगरसेवक अमोल माने , प्रकाश काटे, कमलाकर भोपळे, नंदकुमार गुजर आणि प्रयोदी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा योगिता कोडोलीकर यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्यात आला. उपमुख्यमंत्री पवार यांनी साऱ्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शितल फराकटे, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक महेश सावंत, प्रकाश गवंडी, संदीप कवाळे, महेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित जिल्हानिहाय आढावा बैठकीत कोल्हापूर आणि जळगाव जिल्ह्यांतील पक्षाच्या संघटनात्मक स्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी झालेल्या बैठकीत पवार यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी पवार यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी कार्यरत असलेला पक्ष आहे. एकजुटीनं आणि जनतेच्या विश्वासानं आम्ही महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी वचनबद्ध आहोत.