सर्किट बेंचचे कायमस्वरुपी खंडपीठ करण्यासंबंधी निवेदन
schedule04 Nov 25 person by visibility 23 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर येथील मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कायमस्वरूपी खंडपीठ करावे या मागणीचे निवेदन खंडपीठ कृती समितीतर्फे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर यांना पाठविण्यात आले. सर्किट बेंचचे मुख्य प्रशासकीय न्यायाधीश एम. एस. कर्णिक यांना निवेदन दिले. हे निवेदन मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांकडे पाठविले जाणार आहे. खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक ॲड. व्ही. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने हे निवदेन दिले. शिष्टमंडळात इस्लामपूर येथील माजी बार कौन्सिल सदस्य ॲड. बी.डी.पाटील, ॲड. अरविंद पाटील. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. टी. एस. पाडेकर, सेक्रेटरी ॲड. मनोज पाटील, जॉईन्ट सेक्रेटरी ॲड. सुरज भोसले, लोकल ऑडिटर ॲड. प्रमोद दाभाडे, महिला प्रतिनिधी ॲड. मनीषा सातपुते, कार्यकारणी सदस्य ॲड. वैभव पाटील ॲड. निखिल मुदगल ॲड. मीना पाटोळे ॲड. वैष्णवी कुलकर्णी ॲड. स्नेहल गुरव तसेच मुंबई उच्च न्यायालय सर्किट बेंच मधील वकील ॲड. श्रीकृष्ण गणबावले, ॲड. दत्ता पवार, ॲड. स्वरूप कराडे ॲड. निखिल पवार यांचा सहभाग होता.