शिक्षक मनापासून काम करतात, त्यांचे कोणतेही काम प्रलंबित ठेवले नाही-शिक्षणाधिकारी मीना शेंडकर
schedule07 Nov 25 person by visibility 44 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ कोणत्याही उद्दिष्टापर्यंत पोहोचायचे असेल तर सराव असणे महत्वाचे आहे. शिष्यवृत्ती सराव परीक्षेमुळे विद्यार्थ्यांनां अंतिम परीक्षेत चांगला फायदा होतो. शिक्षकांनी मनापासून काम करावे म्हणून शिक्षकांचे कोणतेही काम प्रलंबित ठेवेलेले नाही.’ असे प्रतिपादन प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी केले. करवीर तालुक्यातील पाडळी येथे पहिल्या शिष्यवृत्ती सराव परिक्षेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
शिक्षणाधिकारी शेंडकर म्हणाल्या आपल्या जिल्ह्यात गुणवत्ता चांगली असून शिक्षकही मनापासून काम करीत आहेत. शिक्षकांनी मनापासून काम करावे म्हणून शिक्षकांचे कोणतेही काम प्रलंबित ठेवेलेले नाही. शिष्यवृत्ती कमिटीतील शिक्षक हे आपला खाजगी वेळ देवून, कोणताही मोबदला न घेता पेपर सेटरचे काम सामाजिक भावनेने करतात ही बाब कौतुकास्पद आहे.
दरम्यान शिष्यवृत्ती परीक्षेचे प्रायोजक तथा महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील व शिक्षक बँकेचे व्हाइस चेअरमन सुरेश कोळी, शिष्यवृत्ती परीक्षा कमिटी प्रमुख उत्तम पाटील, राजेंद्र तौदकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रकाश आंग्रे साहेब, केंद्रप्रमुख राणेश्वर थोरबोले, पुरोगामीचे करवीर तालुका अध्यक्ष बाबू केसरकर सर, शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर कमळकर, केंद्रशाळा मुख्याध्यापक दिलीप जाधव, मुख्याध्यापक सुवर्णा खाडे, सुकुमार मानकर, धनाजी सासने आदी उपस्थित होते.