जिल्हा परिषदेत वंदे मातरम गीतानिमित्त विशेष कार्यक्रम
schedule07 Nov 25 person by visibility 56 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्यावतीने “वंदे मातरम” गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष उपक्रम शुक्रवारी 7 नोव्हेंबर 2025 रोजी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात जिल्हा परिषदेतील अधिकारी व सर्व कर्मचारी यांनी एकत्रितपणे “वंदे मातरम” या गीताचे सामूहिक गायन करून देशभक्तीचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अधिकारी वर्ग तसेच विविध विभागांतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रशासन विभागाच्यावतीने करण्यात आले. संपूर्ण परिसर “वंदे मातरम”च्या सुरांनी दुमदुमून गेला.