Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शाश्वत विकासाची दिशा स्वीकारली, तर देशासाठी उज्ज्वल भविष्य घडवू - विनायक पईडीवाय पाटील कॉलेजच्या अधिष्ठातापदी डॉ. राजेश ख्यालप्पासक्षम उमेदवारलाच उमेदवारी, महाविकास आघाडी म्हणून लढायचं -अजिंक्यतारा कार्यालयात नेत्यांची बैठकगोकुळची गोबरसे समृद्धी बायोगॅस योजना गतिमान, पाच हजार बायोगॅस मंजूर –नविद मुश्रीफराज्यातील यापूर्वीचे सत्ताधारी चमच्याने खायचे, आताचे सत्ताधारी अख्खे भांडेच तोंडाला लावतात-आपच्या मेळाव्यात खरमरीत टीकाजास्तीत जास्त महायुतीचे नगरसेवक निवडून आणू, महापालिकेवर भगवा फडकवू-आमदार राजेश क्षीरसागरशिक्षक मनापासून काम करतात, त्यांचे कोणतेही काम प्रलंबित ठेवले नाही-शिक्षणाधिकारी मीना शेंडकरक्रिडाई कोल्हापूरतर्फे जानेवारी-फेब्रुवारीत बांधकाम विषयक दालन प्रदर्शनठठ ददजिल्हा परिषदेत वंदे मातरम गीतानिमित्त विशेष कार्यक्रम

जाहिरात

 

क्रिडाई कोल्हापूरतर्फे जानेवारी-फेब्रुवारीत बांधकाम विषयक दालन प्रदर्शन

schedule07 Nov 25 person by visibility 137 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील बांधकाम व्यावसयिकांची शिखर संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रिडाई कोल्हापुरातर्फे ३० जानेवारी ते दोन फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ‘दालन – २०२६’आयोजित केले आहे. दालन २०२६ मध्ये बांधकाम विषयक सर्व माहिती एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे अशी माहिती क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत व दालनचे चेअरमन महेश यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली. महासैनिक दरबार हॉल परिसर येथे हे प्रदर्शन होणार आहे.

क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष खोत म्हणाले, ‘बांधकाम विषयक प्रदर्शनाची सुरुवात १९९२ मध्ये झाले. यंदा दालनचे तेरावे वर्ष आहे. कोल्हापूर परिसरातील ग्राहकांना वेगवेगळया ठिकाणचे बांधकाम व इमारत साहित्य विषयक नवीन प्रकल्पांची माहिती मिळणार आहे. या दालनच्या माध्यमातून ग्राहकांना आपल्या पसंतीचे घर निवडता येणार आहे. प्रदर्शनात आतापर्यंत ६० बांधकाम व्यावसायिकांनी सहभाग नोंदविले आहेत. अंदाजे १२५ प्रकल्पाचे सादरीकरण होणार आहे. ’

दालन चेअरमन महेश यादव म्हणाले, ‘दालन प्रदर्शनाची माहिती कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, आणि कोकणातील दोन जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. कोल्हापुरात सर्किट बेंचची स्थापना झाल्यामुळे गुंतवणूक वाढत आहे. कोल्हापुरातील नवीन गृहप्रकल्प व व्यापारी संकुलाची माहिती मिळेल. या प्रदर्शनात प्लॅटिनम स्पॉन्सर, डायमंड स्पॉन्सर दोन, गोल्ड स्पॉन्सर पाच, सिल्व्हर स्पॉन्सर आठ, सेमी स्पॉन्सर बारा, कॉर्नर स्टॉल २४, नियमित स्टॉल १०३ असे १६३ स्टॉल् आहेत. आतापर्यत ७० टक्के स्टॉलचे बुकिंग झाले आहे. बँका व बांधकामशी निगडीत  मटेरियल पुरवठादारासाठी स्टॉल खुले करणार असून या वेळचे दालन ग्राहकांच्या गरजा पूर्ण करेल.’ पत्रकार परिषदेवळी क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, सचिव चेतन वसा, गणेश सावंत, खजानिस अजय डोईजड आदी उपस्थित होते.

…………………………………..

प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी नऊ कमिटया, दालन चेअरमनपदी महेश यादव

पुढील वर्षी जानेवारी महिन्यात होणाऱ्या दालन २०२६ या बांधकाम विषयक प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे, संपूर्ण तयारी क्रिडाई कोल्हापूरतर्फे होते. यामध्ये क्रिडाईचे सगळे पदाधिकारी व सभासदांचा सहभाग असतो. क्रिडाई कोल्हापूरतर्फे दालन कमिटी बनविली आहे. दालन  चेअरमनपदी महेश यादव, व्हाइस चेअरमनपदी आदित्य बेडेकर, कन्व्हेनर निखिल शहा, सह कन्व्हेनर पवन जमादार, सचिव संग्राम दळवी, खजानिस अमोल देशपांडे, सहकन्व्हेनर उदय निचीत, शौर्य मगदूम, सहखजानिसपदी लव पटेल यांची निवड करण्यात आली आहे.बिझमेस प्रमोशन व मार्केट कमिटी चेअरमनपदी गौतम परमार, ग्राऊंड कमिटीपदी श्रीकांत पाटील, पब्लिक रिलेशन कमिटीमध्ये प्रतिक होसमणी, प्रिटींग कमिटी चेअरमनपदी विजय माणगांवकर, हॉस्पिटॅलिटी कमिटी चेअरमपदी केतन शहा, फेलिशिएशन कमिटी चेअरमनपदी बलराज पाटील, सोविनिअर कमिटी चेअरमन संदीप बोरचाटे, रजिस्ट्रेशन कमिटी चेअरमनपदी योगेश आठले यांची निवड झाली आहे. या संदर्भातील माहिती क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष खोत यांनी दिली.  

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes