Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
ऑनलाइन कामांवर एक डिसेंबरपासून असहकार आंदोलन, शिक्षकांनी पुकारला एल्गारराधानगरी- भुदरगडमधील आश्वासक नेतृत्वजिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या संचालकपदी सुनिल बंडगरगांधीनगर बांधकामप्रश्नी आर्थिक चर्चेच्या पापात काँग्रेस कुठेही सहभागी होणार नाही – आमदार सतेज पाटीलशक्तीपीठप्रश्नी केपींची भूमिका आत एक बाहेर एक,त्यांच्यात दम असल्यास प्रकाश आबिटकरांच्या निवासस्थानावर मोर्चा काढावामहाराणी ताराराणींच्या जीवनकर्तृत्वावर चित्रमय चरित्र ग्रंथ निर्मिती सरोज पाटील यांना पद्मजा पवार प्रेरणा पुरस्कार जाहीर, शनिवारी वितरण समारंभ महात्मा फुलेंच्या स्मृतिदिनी बिंदू चौकात अभिवादनअगोदर फॉर्म्युला निश्चित करा, मगच नियोजन समितीतील विकासकामांच्या आराखडयांना मंजुरी : स्थायी समितीचा आक्रमक पवित्रासंवादातून समन्वय, समन्वयातून सहकार्य आणि सहकार्यातून परिवर्तन! कुलगुरू व्यंकट गीतेंचा विद्यार्थ्यांशी संवाद

जाहिरात

 

ऑनलाइन कामांवर एक डिसेंबरपासून असहकार आंदोलन, शिक्षकांनी पुकारला एल्गार

schedule29 Nov 26 person by visibility 15 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  -: सरकारच्या विविध उपक्रमांच्या ऑनलाइन कामामुळे अध्यापनात वारंवार अडथळे निर्माण होत आहेत. अध्यन व अध्यापनासह विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. राज्यातील प्राथमिक शिक्षक सरकारच्या या ऑनलाइन कामकाजामुळे त्रस्त बनले असून येत्या एक डिसेंबर २०२६ पासून त्या विरोधात असहकार आंदोलन पुकारत असल्याची घोषणा सर्व प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीने दिला आहे.

शिक्षक संघटना प्रतिनिधींनी एकत्र येऊन पत्रकार परिषदेत आपल्या भावना मांडल्या. ऑनलाइन कामाच्या व्यापामुळे विद्यार्थ्यांना न्याय देणे शिक्षकांना अशक्य होऊन बसले आहे. त्यामुळे एक डिसेंबरपासून ऑनलाइन कामकाजवर असहकार आंदोलन पुकारत असल्याचा इशारा त्यांनी दिला. या आंदोलन अंतर्गत एक डिसेंबर रोजी सर्व शिक्षक प्रशासकीय ग्रुपमधून पडत असल्याचे म्हटले आहे. तसेच दररोज वेळी, अवेळी येणारे मेसेज, टाळावीत आणि अध्यापनाकडे अधिक लक्ष द्यावे असे आवाहन शिक्षक संघटना प्रतिनिधंनी केले. अंत्यत महत्वाचे अशा यू डायस, पोषण आहाराची कामे वगळता अन्य कोणतीही ऑनलाइन कामे न करण्याचा निर्धार शिक्षकांनी केला असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

पत्रकार परिषदेला विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकारीसह अशोक नायकवडे, राजेंद्र कोरे, मनोजकुमार रणदिवे, बाबूराव परीट, बाळासाहेब निंबाळकर, संजय दाभाडे, विद्याधर पाटील, बी. एस. पाटील, श्रीकांत पोवार, नेताजी कमळकर, मधुकर काळेल, जयवंत पाटील, शशिकातं पाटील, आनंदा गवळी, एस. के. पाटील, सुनील पोवार, गजानन कांबळे, डी. पी. पाटील, गौतम वर्धन आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes