जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या संचालकपदी सुनिल बंडगर
schedule29 Nov 26 person by visibility 12 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या संचालकपदी सुनिल शंकर बंडगर यांची निवड करण्यात आली. सहायक निबंधक श्रीमती डी. एस. चौगले या निवड सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. नूतन संचालक बंडगर हे पंचायत समिती चंदगड येथे सहायक लेखाधिकारी आहेत. संचालकपदासाठी बंडगर यांच्या नावाला संचालक सुनिल पाटील हे सूचक तर जितेंद्र वसगडेकर यांनी अनुमोदन दिले. याप्रसंगी चेअरमन सरदार दिंडे, व्हाइस चेअरमन सोनाली गुरव यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.