Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गांधीनगर बांधकामप्रश्नी आर्थिक चर्चेच्या पापात काँग्रेस कुठेही सहभागी होणार नाही – आमदार सतेज पाटीलशक्तीपीठप्रश्नी केपींची भूमिका आत एक बाहेर एक,त्यांच्यात दम असल्यास प्रकाश आबिटकरांच्या निवासस्थानावर मोर्चा काढावामहाराणी ताराराणींच्या जीवनकर्तृत्वावर चित्रमय चरित्र ग्रंथ निर्मिती सरोज पाटील यांना पद्मजा पवार प्रेरणा पुरस्कार जाहीर, शनिवारी वितरण समारंभ महात्मा फुलेंच्या स्मृतिदिनी बिंदू चौकात अभिवादनअगोदर फॉर्म्युला निश्चित करा, मगच नियोजन समितीतील विकासकामांच्या आराखडयांना मंजुरी : स्थायी समितीचा आक्रमक पवित्रासंवादातून समन्वय, समन्वयातून सहकार्य आणि सहकार्यातून परिवर्तन! कुलगुरू व्यंकट गीतेंचा विद्यार्थ्यांशी संवादसी - टीईटी परीक्षेसाठी कोल्हापूर केंद्र देण्याची मागणी मान्य :राज्याध्यक्ष भरत रसाळेविकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी विद्यार्थ्यांनी ज्ञान -कौशल्यांचा उपयोग करावा : राज्यपाल जिष्णू देव वर्माकोरे अभियांत्रिकीच्या प्रा. शिल्पा पाटील यांना पीएचडी

जाहिरात

 

गांधीनगर बांधकामप्रश्नी आर्थिक चर्चेच्या पापात काँग्रेस कुठेही सहभागी होणार नाही – आमदार सतेज पाटील

schedule29 Nov 26 person by visibility 34 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: ‘तावडे हॉटेल ते गांधीनगर रोडवरील अतिक्रमणित बांधकामे नियमित करण्यावरुन दुर्दैवाने ज्या आर्थिक चर्चा होत आहेत. अमकं झालं, तमकं झालं. कुणी गोळा केल्या, कसं गोळा केल्या याविषयी सुरस चर्चा ऐकावयास येत आहेत. अनेक विद्यमान, आजी माजी नगरसेवक त्यामध्ये सहभागी आहेत. काल भाजपाची बैठक झाली. त्यामध्ये वरिष्ठांकडून दमदाटी करुनहा विषय मंजूर करा अशा सूचना सदस्यांना दिल्याची चर्चा कानावर पडते. त्या आर्थिक गोष्टीत, आम्ही बदनाम होणार नाही. तसेच त्या पापात काँग्रेस कुठेही सहभागी होऊ शकत नाही. काँग्रेसची स्वच्छ भूमिका आहे, जे चुकीचं आहे, त्याला काही आमचा पाठिंबा असणार नाही.’अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांनी मांडली.

अजिंक्यतारा कार्यालय येथे रविवारी (२९ नोव्हेंबर २०२६) पत्रकार परिषद झाली. याप्रसंगी त्यांच्यासोबत काँग्रेसचे शहराध्यक्ष व नगरसेवक प्रवीण केसरकर, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजीत बोंद्रे, नगरसेवक अर्जुन माने उपस्थित होते. आमदार पाटील म्हणाले, ‘गांधीनगर रोडवरील अतिक्रमणाचा विषय गेली दहा बारा वर्षे सुरू आहे. दहा वर्षापूर्वी माझ्याकडे ज्यावेळी विषय आला होता. त्यावेळी नियमात बसवून ही अतिक्रमण कायम कशी करता येतील असा प्रयत्न झाला होता. दरम्यान २०११ पूर्वीची बांधकामे नियमित करण्यासंबंधी कायदा आला. दरम्यानच्या काळात येथील जागा व  हद्द कोणाची हा वाद सुप्रीम कोर्टात गेला.सुप्रीम कोर्टाने हद्द महापालिकेची असल्याचा निर्णय दिला. निर्णय दिल्यानंतर पुन्हा हा प्रश्न महापालिकेच्या कोर्टात आला आहे. यामध्ये तीन विषय आहेत. एक ग्रीन झोन, दुसरा आरक्षित विषय आणि तिसरा ब्ल्यू लाइन… असे तीन वादाचे विषय आहेत. याकडे सहानुभूतीपूर्वक बघणे सरकारकडून अपेक्षित होतं. सरकारने तसा निर्णय घ्यायला हवा होता. आरक्षण जागा व ब्ल्यू लाइनमधील बांधकामे नियमित करू शकता का ? तर ती अडचण आहे.

ज्यावेळी गांधीनगरचा विषय येतो, त्यावेळी कोल्हापुरातील सामान्य माणसानं पहिल्या मजल्यावरुन दुसरा मजला बांधला असेल, शंभर फुटाचे बांधकाम १५० फूट केले असेल तर त्याचे अतिक्रमण तुम्ही कसे काढू शकता ?  धोरण स्वीकारणार असेल तर संबंध शहरासाठी धोरण स्विकारा. शहरात सामान्य माणसाने, पन्नास फूट, शंभर फूट बांधकाम केले असेर तर ते ही नियमित करा.

गेले काही दिवस गांधीनगर रोडवरील बांधकामे नियमित करण्यावरुन दुर्देवाने आर्थिक चर्चा सुरू आहेत अशी चर्चा आहे. त्या चर्चेत काँग्रेस कुठेही सहभागी होऊ शकत नाही. ज्या आर्थिक चर्चा सुरू आहेत त्याविशयी आम्हाला काही माहित नाही. आता भाजप सत्तेत आहे, त्यांनी निर्णय घेतला पाहिजे. आता काँग्रेस विरोधात आहे, आमची भूमिका स्पष्ट आहे. जे चुकीचे आहेत त्याला पाठिंबा असणार नाही. पैशाच्या अनुषंगाने ज्या काही चर्चा कोल्हापुरात सुरू आहेत, त्या पापात काँग्रेस कुठेही सहभागी होणार नाही.’

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes