Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गगन डडकोल्हापुरात तीन दिवसीय “ग्लोरियस"  वैद्यकीय परिषदजिप कर्मचारी सहकारी सोसायटीतर्फे सभासदांच्या पाल्यासाठी अभ्यासिकाकोरे अभियांत्रिकीत ‘मल्टी-बिझनेस मॉडेल इनोव्हेशन’वर मार्गदर्शनप्राचार्य डॉ. धनाजी कणसे यांना आदर्श राज्य प्राचार्य पुरस्कारनाविन्यपूर्ण विचारातून उद्योगक्षेत्रातील संधीचा लाभ घ्या –डॉ. राकेश कुमार शर्मासंवाद  औपचारिकतेपलीकडचा : विद्यार्थ्यांसोबत मनमोकळ्या गप्पांचा! कुलगुरुंच्या निवासस्थानची हृदय भेट ! !आरोग्य विभागात अधिकाऱ्यांचे दरवर्षी गुणांकन, तीन वर्षांच्या रिपोर्ट कार्डवर श्रेणी निश्चितीमाणूसपणाला बंदिस्त करणाऱ्या चौकटी मोडून टाकण्याची जबाबदारी शिक्षकांची : हिंदुराव हुजरे-पाटीलकोजिमाशितर्फे कर्जमर्यादा ६२ लाखापर्यंत ! २४ टक्के लाभांश, मंगळवारपासून खात्यावर जमा ! ! 

जाहिरात

 

नाविन्यपूर्ण विचारातून उद्योगक्षेत्रातील संधीचा लाभ घ्या –डॉ. राकेश कुमार शर्मा

schedule07 Sep 26 person by visibility 2 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  सध्याच्या वेगाने बदलणाऱ्या औद्योगिक युगात विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता नाविन्यपूर्ण विचार, कौशल्यविकास आणि उद्योजकीय दृष्टिकोन आत्मसात करून उद्योगक्षेत्रातील नवनवीन संधीचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी केले.

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या ई-सेलतर्फे आणि आयआयटी बॉम्बे नॅशनल आंत्रप्रेन्युअरशिप चॅलेंज २०२६ अंतर्गत आयोजित ‘युरेका – उद्योजकीय पिच स्पर्धे’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विद्यार्थ्यांमध्ये स्टार्टअप संस्कृती आणि सर्जनशीलता रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत ५७ संघांमधील २१० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपल्या नावीन्यपूर्ण व्यावसायिक कल्पना सादर केल्या.
स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजित पाटील यांनी उद्योगाचे महत्त्व तसेच विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये उद्योगक्षेत्राची असलेली भूमिका अधोरेखित केली. दरम्यान युथकी मंत्रा सर्व्हिसेसचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप सूर्य, सेंट झेवियर्स हायस्कूलचे वरिष्ठ शिक्षक व एनसीसी अधिकारी अँथनी एस. डिसोझा, झेनिथ करिअर अकॅडमी, पेठ वडगावच्या संचालिका डॉ. माधवी रणजित सावंत आणि हाय फाईव्ह ए. आय., कोल्हापूरचे प्रादेशिक प्रमुख प्रवीण शर्मा यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
 

या स्पर्धेत डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटने प्रथम क्रमांक, डी. वाय. पाटील कृषी व तांत्रिक विद्यापीठ, तळसंदेने  द्वितीय, तर डॉ. सायरस पूनावाला स्कूल, वडगावने तृतीय क्रमांक प्राप्त केला. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. सागर जानराव यांनी केले. कार्यक्रमास स्कूल ऑफ कॉम्प्युटर अप्लिकेशन अँड बिझनेस अडमिनीस्ट्रेशनचे संचालक  डॉ. ए. एम. गुरव  उपस्थित होते. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील आणि विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes