Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात तीन दिवसीय “ग्लोरियस"  वैद्यकीय परिषदजिप कर्मचारी सहकारी सोसायटीतर्फे सभासदांच्या पाल्यासाठी अभ्यासिकाकोरे अभियांत्रिकीत ‘मल्टी-बिझनेस मॉडेल इनोव्हेशन’वर मार्गदर्शनप्राचार्य डॉ. धनाजी कणसे यांना आदर्श राज्य प्राचार्य पुरस्कारनाविन्यपूर्ण विचारातून उद्योगक्षेत्रातील संधीचा लाभ घ्या –डॉ. राकेश कुमार शर्मासंवाद  औपचारिकतेपलीकडचा : विद्यार्थ्यांसोबत मनमोकळ्या गप्पांचा! कुलगुरुंच्या निवासस्थानची हृदय भेट ! !आरोग्य विभागात अधिकाऱ्यांचे दरवर्षी गुणांकन, तीन वर्षांच्या रिपोर्ट कार्डवर श्रेणी निश्चितीमाणूसपणाला बंदिस्त करणाऱ्या चौकटी मोडून टाकण्याची जबाबदारी शिक्षकांची : हिंदुराव हुजरे-पाटीलकोजिमाशितर्फे कर्जमर्यादा ६२ लाखापर्यंत ! २४ टक्के लाभांश, मंगळवारपासून खात्यावर जमा ! !  शिक्षकांचे आंदोलन, निवेदन स्वीकारायला वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित ! आमदारांनी केला जिल्हा प्रशासनाला निषेध !!

जाहिरात

 

प्राचार्य डॉ. धनाजी कणसे यांना आदर्श राज्य प्राचार्य पुरस्कार

schedule07 Sep 26 person by visibility 1 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी: भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगलीचे प्राचार्य डॉ. धनाजी जी. कणसे यांना राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे देण्यात येणारा ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य प्राचार्य पुरस्कार’, तर सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. जी. व्ही. माळी यांना ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
    शनिवारी ५ सप्टेंबर २०२६ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्राचार्य कणसे आणि प्रा. माळी यांना  पुरस्कार प्रदान करण्यात आला.   यावेळी उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांची प्रमुख उपस्थिती होती.    राज्यस्तरीय निवड समितीने सन २०२४-२५ चे ११ आणि सन २०२५-२६ चे १८, असे एकूण २९ पुरस्कार जाहीर केले आहेत. या पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये, शाल, श्रीफळ आणि प्रमाणपत्र असे आहे.     प्राचार्य कणसे आणि प्रा.माळी यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल भारती विद्यापीठाचे पदाधिकारी, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes