Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शाळा वाचवा-  शिक्षण वाचवासाठी पाच ऑक्टोबरला मुंबईत धरणे आंदोलनकोल्हापुरात तीन दिवसीय “ग्लोरियस"  वैद्यकीय परिषदजिप कर्मचारी सहकारी सोसायटीतर्फे सभासदांच्या पाल्यासाठी अभ्यासिकाकोरे अभियांत्रिकीत ‘मल्टी-बिझनेस मॉडेल इनोव्हेशन’वर मार्गदर्शनप्राचार्य डॉ. धनाजी कणसे यांना आदर्श राज्य प्राचार्य पुरस्कारनाविन्यपूर्ण विचारातून उद्योगक्षेत्रातील संधीचा लाभ घ्या –डॉ. राकेश कुमार शर्मासंवाद  औपचारिकतेपलीकडचा : विद्यार्थ्यांसोबत मनमोकळ्या गप्पांचा! कुलगुरुंच्या निवासस्थानची हृदय भेट ! !आरोग्य विभागात अधिकाऱ्यांचे दरवर्षी गुणांकन, तीन वर्षांच्या रिपोर्ट कार्डवर श्रेणी निश्चितीमाणूसपणाला बंदिस्त करणाऱ्या चौकटी मोडून टाकण्याची जबाबदारी शिक्षकांची : हिंदुराव हुजरे-पाटीलकोजिमाशितर्फे कर्जमर्यादा ६२ लाखापर्यंत ! २४ टक्के लाभांश, मंगळवारपासून खात्यावर जमा ! ! 

जाहिरात

 

कोल्हापुरात तीन दिवसीय “ग्लोरियस"  वैद्यकीय परिषद

schedule07 Sep 26 person by visibility 6 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य स्त्री रोग व प्रसूती तज्ञ संघटनेतर्फे विभागीय वैद्यकीय परिषद “ग्लोरियस २०२६” ही  अकरा ते तेरा सप्टेंबर २०२६ या कालावधीत कोल्हापुरात हात आहे. ही प्रतिष्ठित तीन दिवसीय परिषद हॉटेल सयाजी येथे आयोजित केली आहे.  अशी  माहिती कोल्हापूर स्त्री रोग व प्रसुती तज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ एम. जे. नागावकर आणि सचिव डॉ. रणजीत किल्लेदार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कोल्हापूर स्त्री रोग व प्रसुती तज्ञ संघटना आणि महाराष्ट्र राज्य स्त्री रोग व प्रसुती तज्ञ संघटनेच्या अधिपत्याखाली ही परिषद होत आहे. “ग्लोरियस 2026” मध्ये प्रसूतीशास्त्र, स्त्रीरोगशास्त्र, वंध्यत्व, फिटल मेडिसिन, रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन, लॅप्रोस्कोपी, मेनोपॉज, किशोरवयीन आरोग्य, लैंगिक आरोग्य, कोल्पोस्कोपी, अल्ट्रासाऊंड आणि क्रिटिकल केअर या विषयांवर अद्ययावत माहिती व मार्गदर्शन दिले जाणार आहे. डॉ. नंदिता पालशेतकर, डॉ. अमेय पुरंदरे आणि डॉ. रोहन पालशेतकर हे वक्ते वैद्यकीय क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान, संशोधन आणि आधुनिक उपचारपद्धतींबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेचे उद्घाटन डॉ. माधुरी कानिटकर , आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
डॉ. माधुरी कानिटकर या भारतीय संरक्षण दलातील प्रतिष्ठित वैद्यकीय अधिकारी असून, लेफ्टनंट जनरल पदापर्यंत पोहोचलेल्या देशातील अग्रगण्य महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. पत्रकार परिषदेस अध्यक्ष डॉ. एम. जे. नागांवकर, सचिव डॉ. रणजीत किल्लेदार, डॉ. भारती अभ्यंकर ,डॉ. प्रसाद हलकर्णीकर,डॉ. इंद्रनील जाधव उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes