आधुनिक महाराष्ट्राच्या शिक्षणमाता सुशीलादेवी साळुंखे !
schedule04 Sep 21 person by visibility 6402 categoryशैक्षणिक

विवेकानंद मध्ये संस्थामाता श्रीमती सुशीलादेवी साळुंखे यांची जयंती साजरी
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : आधुनिक महाराष्ट्राच्या शिक्षणप्रसारात संस्थामाता श्रीमती सुशीलादेवी साळुंखे यांनी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या खांद्याला खांदा लावून समर्पित भावनेने सर्व आयुष्य वेचले. बहुजनांच्या, दुर्बलांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी मातेच्या भूमिकेतून शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केले म्हणूनच त्या आधुनिक महाराष्ट्राच्या शिक्षणमाता आहेत.’ असे मत विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी व्यक्त केले.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या पत्नी, संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांची जयंती विवेकानंद कॉलेजमध्ये साजरी करण्यात आली. याप्रसंगी संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या जीवनकार्याचा आढावा प्रा.गीतांजली साळुंखे यांनी घेतला त्या म्हणाल्या, ‘शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या सारख्या झंझावाताबरोबर संसार करणे ही कठिण बाब होती. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत झोपडीत राहून संसार त्यांनी केला. भूमीगतांना भोजनाची व्यवस्था करीत देश स्वातंत्र लढयात मोलाची भूमिका निभावली. गुरुदेव कार्यकर्त्यांच्या पोटाची काळजी करणाऱ्या आणि वसतिगृहातील अनाथ मुलांची आई होण्याची त्यांची तपधारणा यातूनच संस्था सुसंस्कारानी आकारास आली आहे.’
सुरुवातीस संस्थामातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच प्राचार्य, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी यानी संस्थामातांच्या व शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. प्रा. किरण पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रबंधक सी.बी.दोडमणी, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, उपस्थित होते.