बारावी परीक्षेत विवेकानंद कॉलेजच्या गुणवत्तेची परंपरा कायम
schedule06 May 25 person by visibility 122 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : बोर्ड परीक्षेच्या निकालात १९८७ पासून बारावी कोल्हापूरच्या विवेकानंद कॉलेजने विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेत अव्वलस्थानी राहण्याचा सन्मान २०२५ च्या बारावी बोर्ड परीक्षेतही कायम ठेवला असल्याचे कॉलेजने म्हटले आहे. यावर्षी विज्ञान शाखेत कित फ्रान्सिस डालमेट हा विद्यार्थी ९८.३३ टक्के गुण घेत अव्वलस्थानी राहिला. माधुरी प्रविण जाधवने ९३. ६७ टक्के, साक्षी रविराज शर्मा द्रुती अरुणकुमार मगदूम ९३ टक्के गुण मिळवले आहेत.
वाणिज्य शाखेत रेहान सैफ कित्तूर ९६. ३३ टक्के गुण घेत अव्वल आहे. नंदना अमित कुलकर्णीने ९५. ३३ टक्के गुण तर स्वरा प्रशांत दामुगडेने ९४.८३ टक्के गुण मिळविले. विवेकानंद कॉलेजच्या कला शाखेने यशस्वी परंपरा याही वर्षी कायम ठेवली. कला शाखेचा करण संजय पाटीलने ९३.३३ टक्के गुण, गौरी बालाजी मते ८७.५० टक्के तर इंद्रजित साळोखेने ८७.१७ टक्के गुण संपादन करुन विवेकानंद कॉलेजमध्ये तिसरी येण्याचा बहुमान पटकाविला. भूशास्त्र विषयात १०० पैकी १०० गुण मिळविणारे पाच विद्यार्थी आहेत. कॉम्प्युटर सायन्स्, रसायनशास्त्र, गणित, अकौटन्सी व संस्कृत या विषयात १०० पैकी १०० गुण संपादन करणारे अनेक विद्यार्थी आहेत.
“ विवेकानंद शिक्षण संस्थेची विद्यासमिती आणि विवेकानंद कॉलेजने राबविलेल्या विशेष स्कॉलर बॅचच्या प्रयत्नामुळे यावर्षीही विवेकानंद कॉलेजने सर्वात अव्वलस्थानी राहण्याची परंपरा कायम ठेवली असून विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेतील आमच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतो.” असे मत विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर.आर.कुंभार यांनी व्यक्त केले. याप्रसंगी विज्ञान स्कॉलर बॅच प्रमुख प्रा एस.पी.पाटील, प्रा एस.एन.साळुंखे, वाणिज्य स्कॉलर बॅच प्रमुख प्रा. एस पी वेदांते, कला विभाग स्कॉलर बॅच प्रमुख प्रा एम पी गवळी, प्रा के जे गुजर, प्रा.एस. टी. शिंदे, प्रा विश्वंभर कुलकर्णी, कला वाणिज्य विभागप्रमुख प्रा शिल्पा भोसले, विज्ञान विभागप्रमुख प्रा एम आर नवले उपस्थित होते.