Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शेतकरी संघाचा खत कारखाना सुरू होणार, अध्यक्षांची अधिकारी-कर्मचाऱ्यांसोबत चर्चाहायकोर्टाच्या स्थगितीनंतरही कोल्हापुरात संच मान्यतेची प्रक्रिया ! शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी भेटणार शिक्षणाधिकाऱ्यांना !!मिस चायवाली ! रोटरी सेंट्रलकडून शिवानीच्या स्वप्नांना पाठबळ !!पणदूरकर दाम्पत्याच्या दातृत्वाची, पुनर्पर्चिती  ! भारतीय संरक्षण निधीसाठी पाच लाखाची देणगी !!अंबाबाई मंदिर विकास आराखड्याला निधी मिळाल्याबद्दल भाजपचा आनंदोत्सव, मंदिरात पेढे वाटप लेखकाच्या आयुष्याची अनसुनी कहाणी रुपेरी पडद्यावर ! पायवाटाची सावली २३ मे रोजी प्रदर्शित !!मंदिर विकास आराखडयामुळे जि्ल्हयाच्या विकासाला गती, भाविकांना सोयी सुविधाविवेकानंद कॉलेज हे गुणवत्तेचे मानदंड - प्राचार्य अभयकुमार साळुंखे सुप्रीमच्या आदेशाचे पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, निवडणुकीमुळे कार्यकर्त्यांना संधी मिळणारअंबाबाई मंदिर विकास आराखडा १४४५ कोटीचा, जोतिबा विकास आरखडयासाठी २५९ कोटीचा

जाहिरात

 

अंबाबाई मंदिर विकास आराखडा १४४५ कोटीचा, जोतिबा विकास आरखडयासाठी २५९ कोटीचा

schedule06 May 25 person by visibility 64 categoryमहानगरपालिका

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या मंदिर पुनर्निर्माणाच्या कार्याला अभिवादन म्हणून राज्यातील विविध मंदिर विकास आराखड्यांना एकूण ५५०३ कोटी ६९ लाख रुपयांची मंजुरी देण्यात आली.  पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त राज्य मंत्रिमंडळाची बैठक चौंडी, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर येथे झाली. दरम्यान या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील श्री करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर व श्री जोतिबा मंदिर परिसर विकास आराखड्यांना अनुक्रमे १४४५.९७ कोटी व २५९.५९ कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोल्हापूर पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री व सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ, तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालक सचिव राजगोपाल देवरा उपस्थित होते.या मंजुरीनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दोन्ही आराखड्यांसाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले.  बैठकीस कोल्हापूर जिल्ह्यातून जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे, कार्यकारी अभियंता चंद्रकांत आयरेकर व रोहित तोंदले, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सागर पाटील, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे, उपअभियंता सुयश पाटील तसेच संबंधित कन्सल्टंट व आर्किटेक्ट संतोष रामाणे व अभिनंदन मगदूम उपस्थित होते.

……………………

अंबाबाई मंदिर विकास आराखड्यात : मंदिराचे दुरुस्ती व संवर्धन, किरणोत्सव मार्गातील अडथळे व अतिक्रमणांचे निर्मूलन, मंदिर परिसरातील दुकान गाळ्यांचे व्यवस्थापन, दर्शनासाठी अच्छादित मंडप, स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्याची सुविधा, लॉकर्स, शू स्टँड, भवानी मंडप परिसराचा ‘हेरिटेज प्लाझा’ म्हणून विकास या कामांचा समावेश आहे.

…………………………..

श्री जोतिबा मंदिर व परिसर विकास आराखड्यात : श्री क्षेत्र जोतिबा व यमाई मंदिराचे संवर्धन, पायवाटांचे जतन, कर्पूरेश्वर, चव्हाण व मुरलीधर तलावांचे संवर्धन, भाविकांसाठी वाहनतळ, सुविधा केंद्र, अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताद्वारे ज्योतस्तंभ निर्मिती, घनकचरा व सांडपाणी प्रकल्प, केदार विजय गार्डन व नवतळे परिसराचे सुशोभीकरण, यमाई मंदिर चाफेवन परिसर विकास या कामांचा समावेश आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes