गोखले कॉलेजचा बारावीत विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के
schedule06 May 25 person by visibility 123 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : बारावी परीक्षेत येथील गोपाल कृष्ण गोखले कॉलेजचा विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेचा निकाल ९१.१७ टक्के, कला शाखेचा निकाल ६०.१२ टक्के, तर एचएसव्हीसीचा निकाल ९८.१८ टक्के लागला आहे.विज्ञान शाखेत कॉलेजचा विद्यार्थी अर्चित मुरली रोहिडाने ९५.५० टक्के, युगंधरा सुजित मोहितेने ८९ टक्के, मीत हरेश भाटेजा या विद्यार्थ्याने ८८.८३ टक्के गुण मिळवले. वाणिज्य शाखेतील विद्यार्थी स्वप्नील भगवान पाथरेने ६६.६७ टक्के, सोहम राहुल जमादारने ६४ टक्के तर यश समाधान चंदनशिवेने ६०.१७ टक्के गुण मिळवले.कला शाखेतील विद्यार्थी प्रतीक्षा हरी साळुंखेने ६३.६७ टक्के, सीमा संजय चंदनशिवेने ६१.३३ टक्के, तनिष्क धनाजी दुर्गुळे या विद्यार्थिनीने ६० टक्के गुण मिळवले. एचएसव्हीसी परीक्षेत प्रिती भगवानदास जयस्वला ७२.६७ टक्के, मृणाली राजेश सुतार ६८ टक्के, संजीवनी कल्लाप्पा मनूरकर ६५.८३ टक्के गुण मिळवले.