पाचवी -आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थी राज्यात पहिले
schedule10 Jul 25 person by visibility 687 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल गुरुवारी जाहीर झाला. या परीक्षेमध्ये इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत ग्रामीण विभागात कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थी राज्यात पहिले आले. विशेष म्हणजे इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण विभागातील राज्य गुणवत्ता यादीतील कोल्हापूर जिल्ह्यातील 27 पैकी 24 विद्यार्थी हे जिल्हा परिषद शाळेतील आहेत. जिल्हा अंतर्गत कट ऑफ मध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात दुसरा आहे. तर कोल्हापूर जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी राज्यापेक्षा अधिक आहे. शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी परीक्षेचा राज्याच्या निकालाची टक्केवारी 23.90 आहे तर कोल्हापूर जिल्ह्याची टक्केवारी 36.10 टक्के आहे. इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या निकालाचे टक्केवारी 19.30 टक्के आहे तर कोल्हापूर जिल्ह्याचे टक्केवारी 35.85 टक्के आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांनी पुन्हा एकदा शिष्यवृत्ती परीक्षेतील आपला लौकिक कायम राखला आहे
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या संकेतस्थळावर शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला. राज्य गुणवत्ता यादीमध्ये इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण विभागात भुदरगड तालुक्यातील विद्यामंदिर सोनाली येथील ईश्वरी दिग्विजय कोटकरने 294 गुण प्राप्त करत पहिला क्रमांक मिळवला. केंद्र शाळा फेजिवडे येथील सौरभी सूर्यकांत डवर हिने 292 गुण मिळवत दुसरा तर विठ्ठल विद्या मंदिर पेद्रेवाडी येथील विद्यार्थी श्लोक शशिकांत पाटील, आणि भुदरगड तालुक्यातील विद्यामंदिर सोनाळी येथील स्वरा आदर्श साबळे यांनी प्रत्येकी 290 गुण प्राप्त करत तिसरा क्रमांक मिळवला आहे. राज्य गुणवत्ता यादीमध्ये केंद्र शाळा पिंपळगाव येथील आदित्य दिगंबर मिसाळ व मराठी विद्या मंदिर माडवळे येथील विद्यार्थी शिरीष मनोहर मसुरकर यांनी प्रत्येकी 286 गुण मिळवत सहावा क्रमांक पटकावला आहे
राज्य गुणवत्ता यादीतील शहरी विभागात इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूर महापालिकेच्या श्रीमती लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर येथील विद्यार्थिनी स्वरा अरुण पाटील व अद्वैत दिलीप पोवार यांनी प्रत्येकी 288 गुण पाचवा क्रमांक मिळवला आहे. जरग विद्यामंदिराचे विद्यार्थी संस्कार शहाजी पाटील व मधुरिमा भरत कुमार जाधव यांनी प्रत्येकी 284 गुण मिळवत सहाव्या क्रमांकावर आहेत. कागल येथील शिवाजी विद्यालय जुनियर कॉलेज मधील विद्यार्थी श्लोक संदीप भारमल हा 282 गुणासह सातव्या क्रमांकावर आहे. इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा शहरी विभागात राज्य गुणवत्ता यादीमध्ये आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल शाळेची विद्यार्थिनी सौश्रुती अमित पुंडपळ हिने 290 गुण मिळवत राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. इचलकरंजी येथील डॉ. बापूजी साळुंखे हायस्कूलमधील श्वेतल सुनील बंडगर, व्यंकटराव हायस्कूल आजरा येथील विवेक धनाजी पाटील व व्यंकटराव हायस्कूल आजरा येथील स्वराज प्रवीण निंबाळकर यांनी प्रत्येकी 280 गुण मिळवत राज्य गुणवत्ता यादीत आठव्या स्थानावर आहेत. इचलकरंजी येथील गंगामाई गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी संस्कृती संतोष आवळे हिने 278 गुण घेऊन दहाव्या क्रमांकावर आहे. इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण विभागात राज्य गुणवत्ता यादीमध्ये राधानगरी तालुक्यातील श्री नामदेवराव भोईटे विद्यालय कसबा वाळवा येथील विद्यार्थिनी नुपूर युवराज पवार हिने 288 गुणासह पहिला क्रमांक पटकावला आहे. पुष्पनगर कुमार भवन येथील पार्थ चंद्रकांत पाटील या विद्यार्थ्याने 284 गुणाचे तिसऱ्या क्रमांकावर तर छत्रपती शिवाजी हायस्कूल पन्हाळा येथील विद्यार्थ्यांनी अंजली बाबासो पाटील 282 गुणासह चौथ्या क्रमांकावर आहे. तिरवडे येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलचा विद्यार्थी यश लक्ष्मण पाटील व कुमारभवन पुष्पनगर येथील पार्थ बजरंग व्हरकट यांनी प्रत्येकी 278 गुणासह सातव्या स्थानावर आहेत. दत्ताजीराव कदम हायस्कूल शिरोळ येथील अविष्कार मुकुंद माळी या विद्यार्थ्याने 278 गुण घेत सातव्या स्थानावर आहे. शहरी आणि ग्रामीण या दोन्ही विभागात मिळून कोल्हापूर जिल्ह्यातील इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ऐंशी विद्यार्थी हे राज्य गुणवत्ता शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.
या निकालाविषयी कोल्हापूर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी मीना शेंडकर म्हणाल्या, "शिष्यवृत्ती निकालामध्ये कोल्हापूर जिल्ह्याने राज्यामध्ये आघाडी घेतली आहे राज्य गुणवत्ता यादीतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या पैकी 19 टक्के विद्यार्थी कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील अनुक्रमे भुदरगड, राधानगरी, हातकणंगले हे पहिल्या तीन क्रमांकावर असणारे तालुके आहेत. सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी त्यांचे पालक शिक्षक मुख्याध्यापकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी अभिनंदन केले आहे. त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत."