Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गांधीनगरमधील अनधिकृत बांधकामावरील कारवाईला स्थगिती देण्यास सर्किट बेंचचा नकारअजीम नवाज राही यांना रत्नाकर काव्य पुरस्कारकुलगुरू नियुक्तीला दिरंगाई, सिनेट सदस्यांचे राज्यपालाना पत्र ! लाठया खाऊ, जेलमध्ये जाऊ पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही ! नऊ जूनला कोल्हापुरात महामोर्चा !!डीवाय पाटील ज्युनिअर कॉलेजची महिमा शिर्के बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीयई-चलन संदर्भातील मागण्यांवर सरकार सकारात्मक, वाहतूकदारांना न्याय देण्यासाठी कार्यवाही - प्रताप सरनाईकउल्का महाजन, चिन्मयी सुमीत, प्रतिभा खैरनार, नितीन कोत्तापल्ले यांना दमसा सभेचे पुरस्कारहद्दवाढीवरुन महापालिका सभा तहकूब, गांधीनगरातील अतिक्रमण हटविण्यासाठी सभागृह आक्रमक चारचाकी वाहन सारले बाजूला…नगरसेवक सवार झाले इलेक्ट्रिक बाईक, सायकलवर !कृष्णराज महाडिक यांचा बार्शी - सोलापूर एसटी प्रवास

जाहिरात

 

आणू महादेवीला घरी ! दोन लाख चार हजार चारशे एकवीस कोल्हापुरकरांची स्वाक्षरी !

schedule02 Aug 25 person by visibility 400 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : नांदणी येथील स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातील महादेवी हत्तीणीला पोलीस बंदोबस्तात गुजरातच्या वनतारामध्ये रवाना करण्यात आल्यानंतर आता लाडक्या महादेवीला परत आपल्या घरी आणण्यासाठी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी स्वाक्षरी मोहीम सुरु केली होती. या मोहिमेत कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल सव्वा दोन लाखहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. आपली महादेवी नांदणी मठातच राहिली पाहिजे असा संदेश यानिमित्ताने दिला आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी सुरु केलेल्या या स्वाक्षरी मोहिमेला कोल्हापूरकरांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. शनिवारी, दोन ऑगस्ट रोजी सकाळी ही पत्रे घेऊन माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी नांदणी येथील मठात पोहोचले. याप्रसंगी दत्त साखर कारखानाचे अध्यक्ष गणपतराव पाटील, संचालक शेखर पाटील, नांदणी बँकेचे आप्पासाहेब लाटे, राहुल खानजिरे, शशिकांत खोत, विजय पाटील, विजय चौगले, सुदर्शन खोत, नितीन बागे उपस्थित होते. नांदणी मठ येथे महास्वामी यांच्या हस्ते स्वाक्षरी  केलेल्या या सर्व फॉर्मचे पूजन झाले.  दरम्यान  दुपारी एक वाजता रमणमळा पोस्ट ऑफीस येथून हे सर्व फॉर्म राष्ट्रपती द्रोपदी मूर्म यांना पाठविण्यात येणार आहेत. आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ही पत्रे राष्ट्रपतींच्याकडे पाठविली जातील.

  

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes