राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषदेचे २५ जूनला मुंबईत आयोजन
schedule21 Jun 21 person by visibility 312 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
महाराष्ट्र सरकारने खोटे अध्यादेश काढून मराठा समाजाची दिशाभूल केली आहे. त्याचबरोबर २२ जूनच्या राज्यमंत्रीमंडळाच्या बैठक़ीत मराठा समाजाचे विविध मागण्यांबाबत जे निर्णय झाले होते त्याची योग्य ती कार्यवाही झालेली नाही. यासाठी आंदोलनाची पुढील दिशा आणि धोरणे ठरवण्यासाठी येत्या २५ जून रोजी मुंबईत राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सुरेश पाटील आणि
विजयसिंह महाडिक आणि पाटील यांनी कोल्हापुरात दिली.
साेमवारी, त्यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन गोलमेज परिषदेची माहिती दिली. या राज्यव्यापी गोलमेज परिषदेला केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार नरेंद्र पाटील, आमदार प्रसाद लाड, आमदार रमेश पाटील उपस्थित राहणार आहेत. तसेच इतिहास तज्ञ, सकल मराठा समाज क्रांती मोर्चा, राज्यातील ४२ विविध संघटना व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने पुर्नविचार याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करावी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महांमडळास २००० कोटींची तरतूद करावी. सारथी संस्थेला २००० कोटी निधी तात्काळ मंजूर करावा यासह १४ विषयांवर चर्चा होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला भरत पाटील, शिवाजीराव लोंढे, अनिकेत आयरेकर, जयदिप शेळके, यशवंत शिंदे, सचिन साठे, मारुती जांंभळे, युवराज पाटील, विकास साळोखे, मिथुन ठाकूर, आनंदराव पाटील, दादासाहेब देसाई उपस्थित होते