करवीरवर माझं शंभर टक्के लक्ष, राहुलला आमदार करणारच - आमदार सतेज पाटील
schedule13 Nov 24 person by visibility 32 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्रचाराच्या निमित्ताने मी जरी जिल्हाभर फिरत असलो तरी करवीरवर माझं शंभर टक्के लक्ष आहे. माजी मंत्री श्रीपतराव बोंद्रे यांच्यानंतर करवीरवासियांची अस्मिता दिवंगत आमदार पी.एन. होते. त्यांची करवीरची विकासाची अधुरी राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि मला महाराष्ट्रात आमदार म्हणून ज्यांनी ओळख निर्माण करुन दिली त्या जुना करवीरकरांमध्ये राहूल पाटील यांना आमदार करण्यासाठी प्रचंड जोश आहे. राहुल पाटील यांना आमदार करू या. असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केले.
करवीर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राहूल पी.एन.पाटील यांच्या प्रचारासाठी खुपिरे येथे सभा आयोजित केली होती. खासदार शाहू महाराज यांची प्रमुख उपस्थितीत सभा झाली.
आमदार सतेज पाटील म्हणाले, जुना करवीर हा माझा घरचा मतदारसंघ असल्याने मी तुम्हा सर्वांची कामे केली आहेत.आता या संघर्षाच्या, संकटकाळी तुम्ही सर्वांनी माझ्या पाठीशी खंबीरपणे राहून राहुलला आमदार करा.
खासदार शाहू महाराज म्हणाले, महायुती सरकारने अडीच वर्षांत महाराष्ट्राची अधोगती केली असून राज्याची प्रगती करण्यासाठी महाविकास आघाडी आणि करवीर मधून राहुल पाटील यांना विजयी करा.
राहुल पाटील म्हणाले, दिवंगत पी. .एन.पाटील यांनी कुणाकडून पाच पैसे न घेता हजारो नोकऱ्या देऊन अनेकांचे संसार उभारले. पण विधानसभा निवडणुकीत कुणालाही त्रास दिला नाही विधानसभेचा निकाल साहेबांच्या कार्याला साजेसा करुया.
यावेळी आमदार जयंत आसगावकर, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, चेतन नरके, राजेंद्र सूर्यवंशी,शेकापचे क्रांतीसिंह पवार-पाटील, स्वाभिमानीचे बाजीराव देवाळकर आदींची भाषणे झाली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील, बाबासाहेब देवकर, बाजीराव पाटील,हंबीरराव चौगले, राजेंद्र खानविलकर उपस्थित होते. सर्जेराव पाटील-हुजरे यांनी आभार मानले.