केपी पाटलांना विकासकामाच्या परिक्षेत शून्य मार्क मिळतील -आमदार प्रकाश आबिटकरांचा टोला
schedule13 Nov 24 person by visibility 30 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : “विकासकामांचे मुल्यमापन लोकांच्याकडून होते. दिशाभूल करणारे कोण आहेत ही सूज्ञ जनता जाणुन आहे त्यामुळे के.पी.पाटीलांना विकास कामांत शून्य मार्क मिळतील” असा टोला आमदार प्रकाश आबिटकर यांनी लगावला.
कासारपुतळे, कासारवाडा, सावर्डे पाटणकर, ढेंगेवाडी येथील प्रचारसभेत ते बोलत होते. बिद्रीचे माजी संचालक नंदकुमार सुर्यवंशी, युवक नेते शिवराज खोराटे, अभय पाडळकर, राजेश मोरे आदी प्रमुख उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मारुती सुर्यवंशी होते.
आमदार आबिटकर म्हणाले, ‘सातत्याने न्याय देण्याची भुमिका घेवून आपण काम करीत आहे. बसुदेव भुजाई योजनेमुळे कासारवाडा कासारपुतळे येथील जमीनी ओलीताखाली येईल. हा भाग सुजलाम सुफलाम करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार आहे. मागासवर्गीयांच्या ज्या-ज्या मागण्या होत्या त्या पुर्ण करण्याचा प्रयत्न आपण केला असून आपला आशीर्वाद मिळावा. निवडणुकीपुरते मतदार संघात फिरणारे के.पी.पाटील यांनी त्यांच्या दहा वर्षाच्या काळात मतदार संघासाठी नेमकं कोणतं काम केलं व पुढील पाच वर्षांमध्ये काय व्हिजन घेऊन जाणार आहे हे न सांगता जनतेची दिशाभूल करण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे अशा निष्क्रिय उमेदवारास मते देऊन आपले मत वाया घालू नये.”
अभय पाडळकर म्हणाले, ‘के. पी. पाटील यांच्या आमदारकीच्या काळात येथे कोणतीही कामे झाली नाहीत विशेष म्हणजे खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी केलेल्या एका विकासकामांच्या पाटीवर के.पी.पाटील यांचे नाव होते पण ते निसर्गाला मान्य नसावे त्यामुळे ती के पी पाटील यांची पाटी ही वाहून गेली.”
यावेळी संभाजीराव आरडे, युवानेते अभिषेक डोंगळे, संजय पाटील, ए.बी.पाटील सर, संदीप मगदूम, शिवाजी चौगले, विलास पाटील, मानसिंग पाटील, एकनाथ वागवेकर, कासारपुतळे येथील सिताराम खाडे, आनंदाने काळे, जयसिंग पाटील, शिवाजी पाटील, सातापा वरोटे, एम. डी. चव्हाण, बाबुराव बसरवाडकर, सदाशिव बानगुडे, कृष्णात फराकटे, मधुकर कांबळे, कुमार गाडीवडर, रंगराव पाडळक, रमेश हिरूगडे, लक्ष्मण आकनुरकर, सावर्डे (पा.) बबन पाटील, सरपंच सुमन मोरे, श्रीकांत गुरव उपसरपंच सुरेश परीट ग्रा. प. सदस्य वंदना गुरव संगीता सावंत शितल काशीद आनंदा कांबळे विनोद कांबळे, ढेंगेवाडी येथील बाबासो आदमापुरे, दिलीप आदमापूरे, सागर आत्मापुरे शहाजी भरकाळे उपस्थित होते.
.............