महापालिका शाळातंर्गत क्रीडा-शोभायात्रा संचलन स्पर्धा दिमाखात
schedule19 Feb 25 person by visibility 196 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीमार्फत ७३ व्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धा २०२४-२५ अंतर्गत शोभायात्रा संचलन स्पर्धां झाली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक महापालिका श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर, द्वितीय क्रमांक टेंबलाईवाडी विद्यामंदिर व तृतीय क्रमांक यशवंतराव चव्हाण विद्यामंदिर यांनी मिळविला. प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांचे प्रोत्साहन व उपायुक्त पंडित पाटील, सहाय्यक आयुक्त उज्वला शिंदे, प्रशासनाधिकारी आर.व्ही.कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी मैदान येथे घेण्यात आली. स्पर्धेत महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्यात कोल्हापूरचे योगदान, महाराष्ट्रातील सण, अखंड भारत या विषयावर सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशासनाधिकारी आर. व्ही कांबळे यांनी केले. अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी अध्यक्षस्थानी होते. केले. विजयी शाळांना रोख पारितोषिक व आकर्षक ट्रॉफी वितरण करण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण केतकी जमदग्नी, एन. डी. चौगले, उज्वला पटेल यांनी केले. विठ्ठ्ल देवणे यांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धेचे नियोजन शारीरिक शिक्षण निरीक्षक सचिन पांडव, संजयकुमार देसाई, किरण माळी, राहुल बागडे, अजित कानकेकर, मज्जीद नदाफ यांनी केले. यावेळी उपशहर अभियंता महादेव फुलारी, शैक्षणीक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, उषा सरदेसाई, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, दिलीप माने, विलास पिंगळे, शिक्षक व सेवक कर्मचारी पतसंस्था सभापती मनीषा पांचाळ, उपसभापती लक्ष्मण पवार, कनिष्ठ लिपिक अजय गोसावी, संजय शिंदे उपस्थित होते.