आमदार शिवाजीराव पाटलांच्या उमेदवारांना गोकुळमध्ये आमची लोक मते देतील याची खाञी नाही – हसन मुश्रीफांचा पलटवार
schedule01 May 26 person by visibility 56 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : जिल्हा परिषदेच्या निवडणूक कालावधीतील प्रचार सभेमुळे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या आठ जागा पडल्या, हे त्यांचे दुख मी समजू शकतो. माञ आमदार शिवाजीराव पाटील हे ज्या पद्धतीने माझी व गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफसह अन्य संचालकांची नाहक बदनामी करत आहेत, ते पाहून आमचे लोक संतप्त झाले आहेत. त्यामुळे आमदार पाटील यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, गोकुळच्या निवडणुकीत त्यांच्या उमेदवारांना आमचे लोक मते देतील याची खात्री देऊ शकत नाही. या सगळया गोष्टी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगणार आहोत. शिवाय आमदार पाटील यांचे शिक्षण किती, त्यांचे पूर्वायुष्य काय, त्यांनी जास्तीत जास्त दिवस कुठे खर्ची घातले आहेत या साऱ्याची आपणास माहिती आहे असा पलटवार वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.
गोकुळ दूध संघाच्या राजकारणातून चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी मंत्री मुश्रीफ यांना लक्ष्य केले आहे. गोकुळचे चेअरमन मुश्रीफ व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे यांच्यावरही पाटील यांनी निशाणा साधला. या साऱ्याचा मुश्रीफ यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, आमदार पाटील यांनी टिका थांबवली नाही तर येत्या निवडणुकीच्या कालावधीत आमची लोक त्यांना मते देणार नाहीत. शिवसेनेच्या संचाकावरही त्यांनी टीका केली. आमदार पाटील यांनी जीवनातील जास्तीत जास्त दिवस कुठे खर्ची घातलेत याची सविस्तर माहिती आहे, पण त्याबद्दल फारसे बोलणार नाही. अशा शब्दांत मुश्रीफ यांनी पलटवार केला.