Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांचे निधन बागेश्वर महाराजवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, कोल्हापुरात शिवभक्तांची मागणीविवेकानंद  कॉलेजमध्ये  राजेंद्र साळुंखे  यांचा  सेवानिवृत्तीनिमत्त सत्कारशहर स्वच्छतेच्या कामकाजात कसूर झाल्यास आरोग्य निरीक्षक - मुकादमांवर कारवाई ! आयुक्त करणार पहाटेही तपासणी ! !जिपच्या स्थायी सभेत ग्रामीण प्रश्नांना वाचा, गारगोटीतील पाणी योजनेचे काम संथगतीने !गैरहजर अधिकाऱ्याना नोटिस !!गोकुळची निवडणूक तात्काळ सुरू करून महायुती म्हणूनच लढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश- नविद मुश्रीफ यांची माहिती कोरोनाशी भिडताना हे पुस्तक एका संकटाचा दस्ताऐवज नसून मानवी जिद्दीची गाथा - मंत्री हसन मुश्रीफरूट ३२ मुक्तहास्य स्पर्धा, विजेत्यांना लाख रुपयांची बक्षीसेकोल्हापुरात तीस एप्रिलपासून एक दिवसआड पाणी पुरवठामहाराष्ट्र जैन साहित्य परिषदेचे पुरस्कार जाहीर ! वसंत भोसले, महावीर अक्कोळे, निलम माणगावेंचा समावेश ! !

जाहिरात

 

विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांचे निधन

schedule30 Apr 26 person by visibility 2200 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी  : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिवा प्राचार्या शुभांगी मुरलीधर गावडे (वय 53 वर्षे ) यांचे  गुरुवार दि. 30 एप्रिल 2026 रोजी अ  निधन  झाले.  श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या त्या नात होत्या तसेच   संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या कन्या व  संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या आकस्मिक निधनाने  शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.  

त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ताराबाई पार्क, कोल्हापूर येथील संस्थेच्या  परिसरातील शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे स्मृतिभवन येथे शुक्रवारी एक मे 2026 रोजी सकाळी 9 ते सकाळी 11 या वेळेत ठेवण्यात येणार आहे. अंत्यविधी शुक्रवारी  दुपारी बारा वाजता पंचगंगा स्मशानभूमी, कोल्हापूर येथे करण्यात येणार आहे. 

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी 1954 साली स्थापन केलेल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये सन  2008 पासून सलग 18 वर्षे सचिवा म्हणून त्यांनी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचा शैक्षणिक, सामाजिक कार्याचा वारसा समर्थपणे सांभाळला.  संस्थेच्या सुमारे 410 संस्कार केंद्रातून त्यांच्या सचिवा पदाच्या प्रशासकीय  कालावधीत  त्यांच्या कार्यकर्तृत्वातून शैक्षणिक क्षेत्रात आधुनिक बदल करण्यासाठी त्यांनी नवनवीन योजना संस्थेच्या विविध शाखांमध्ये राबविल्या.  इंजिनिअरींग, नर्सिंग, हॉटेल मॅनेजमेंट, आर्टिफिशीयल इंटिलिजन्स्,  लॉ कॉलेज या शाखांचा शुभारंभ त्यांच्या कार्यकाळात झाला.  त्यांनी संस्थेच्या विविध शाखांना गुणवत्तापूर्ण करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा पुरवून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा नावलौकिक वाढविला. संस्थेच्या विद्यार्थ्यांच्यासाठी साहित्य्, नृत्य्, नाटय्, कला, संगीत आणि इंग्रजी, फ्रेंच, संस्कृत, जर्मन भाषांच्या विकासासाठी महत्व्‍पूर्ण योगदान दिले.  त्यांचे शिक्षणविषयक विचार समाजाच्या प्रबोधन विकासासाठी मार्गदर्शक आहेत. 

त्यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये सहशिक्षिका, प्राचार्या व सेक्रेटरी पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. त्यांनी न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या, शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट सदस्या, राज्य शासनाच्या तेजस्विनी महिला आश्रमामध्ये शिक्षणतज्ज्ञ व महिला कल्याण समितीवर सदस्य म्हणून काम केले आहे. त्यांना आदर्श महिला पुरस्कार, राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार,  आधुनिक सावित्री पुरस्कार  इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी  राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सेमीनार मध्ये आपले शैक्षणिक विचारांसोबत कृतीशील आराखडा सादर केला.

त्यांच्या पश्चात आई, वडील, बहिण, पती, दोन मुले, सासू, सुन  असा मोठा परिवार आहे.   रक्षाविसर्जन शनिवार दिनांक 02.05.2026 रोजी सकाळी 9.00 वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथो होणार आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes