Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आमदार शिवाजीराव पाटलांच्या उमेदवारांना गोकुळमध्ये आमची लोक मते देतील याची खाञी नाही – हसन मुश्रीफांचा पलटवारवारणा शिक्षण मंडळास पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी मान्यता; पुणे विभागातील पहिले खासगी महाविद्यालयबार असोसिएशनच्या निवडणुकीत अॅड. राजेंद्र मंडलिक पॅनेलची बाजी, अॅड. प्रशांत चिटणीस पराभूतकोल्हापूर जिल्ह्यातील बारा पोलिस अधिकारी - कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्हगोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा – चेअरमन नविद मुश्रीफगोकुळमध्ये मंत्री मुशीफांना सोडून युती करावी, अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचा - आमदार शिवाजी पाटीलविवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांचे निधन बागेश्वर महाराजवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, कोल्हापुरात शिवभक्तांची मागणीविवेकानंद  कॉलेजमध्ये  राजेंद्र साळुंखे  यांचा  सेवानिवृत्तीनिमत्त सत्कारशहर स्वच्छतेच्या कामकाजात कसूर झाल्यास आरोग्य निरीक्षक - मुकादमांवर कारवाई ! आयुक्त करणार पहाटेही तपासणी ! !

जाहिरात

 

वारणा शिक्षण मंडळास पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी मान्यता; पुणे विभागातील पहिले खासगी महाविद्यालय

schedule01 May 26 person by visibility 16 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या शैक्षणिक प्रगतीत आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटर्नरी अँड ऍनिमल सायन्स महाविद्यालय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारच्या मत्स्यपालन, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्रालयाकडून लेटर ऑफ परमिशन प्राप्त झाले आहे. पुणे विभागातील हे पहिले खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय असून ८० प्रवेश क्षमतेस मान्यता देण्यात आली आहे. अशी माहिती वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष, डॉ. विनय कोरे यांनी दिली.

या मान्यतेपूर्वी व्हेटर्नरी कौन्सिल ऑफ इंडिया तसेच महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्या तज्ज्ञ समित्यांनी दोन वेळा प्रत्यक्ष भेट देऊन सर्व निकषांची काटेकोर तपासणी केली. आवश्यक पायाभूत सुविधा, अत्याधुनिक प्रयोगशाळा, पशुवैद्यकीय रुग्णालय, तसेच तज्ञ प्राध्यापक व प्रशिक्षित कर्मचारी वर्ग उपलब्ध असल्याची खात्री झाल्यानंतरच ही मान्यता देण्यात आली. या मान्यतेस अधिकृत स्वरूप प्राप्त झाले असून, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन (B. V. Sc. & A.H) ही पदवी मिळणार आहे. या पत्रकार परिषदेत वारणा विद्यापीठाचे, कुलााधिकारी, एन. एच. पाटील, कुलगुरू, डॉ. डी. टी. शिर्के, श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. विलास कारजिन्नी, डॉ. कल्पना पाटील, डॉ. यू. बी. देशनवर व जे. के. शिंदे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes