शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाच्या अंजली गोरेला रौप्य पदक
schedule02 Nov 24 person by visibility 582 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : एसएनडीटी महिला विद्यापीठाने विभागीय स्तरावर पुणे येथे आयोजित क्रीडा स्पर्धेमध्ये शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाच्या अंजली गोरे या विद्यार्थिनींने क्रीडा क्षेत्रातील कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन घडविले. तायक्वांदोत तिने रौप्य पदक मिळविले आहे. शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील यांनी अंजलीने उल्लेखनीय यश मिळवल्याबद्दल तिचे अभिनंदन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर यांनी अंजलीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या क्रीडा स्पर्धांसाठी संतोष फराकटे, अनिता अथने, प्रज्वल देवर्डेकर यांनी कष्ट घेतले.