शिवाजी विद्यापीठाचा संघ आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव स्पर्धेसाठी रवाना
schedule19 Feb 25 person by visibility 132 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर ; गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे १८ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या २६ व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव या स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा अथलेटिक्स पुरुष व महिला , व्हॉलीबॉल पुरुष व महिला , कबड्डी पुरुष व महिला , खो-खो पुरुष व महिला , बॅडमिंटन पुरुष व महिला , बास्केटबॉल पुरुष व महिला , टेबलटेनिस पुरुष व महिला , बुब्दीबळ पुरुष व महिला या सर्व क्रीडा प्रकारात ७६ पुरुष व ७६ महिला खेळाडू त्याचबरोबर २० प्रशिक्षक व संघव्यवस्थापक असा १७२ जण या स्पर्धेत सहभागी होणेसाठी रखाना झाले आहेत. खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा डॉ.डी.टी. शिर्के ,प्र-कुलगुरु प्रा. डॉ. डी. पी. एस. पाटील, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, पथक प्रमुख प्रा. डॉ. एन.डी. पाटील, प्रा.डॉ. सुनिल चव्हाण , प्रा. किरण पाटील,डॉ संजय पाटील, डॉ आकाश बनसोडे, डॉ देवेंद्र बिरनाळे, डॉ श्रीदेवी पवार, डॉ स्वप्नील पाटील, डॉ रमेश पाटील, प्रा हर्षल पाचोरे , डॉ संदीप पाटील, डॉ गणेश सिंहासने, डॉ राजेंद्र रायकर, श्री सुचय खोपडे आदी उपस्थित होते.