महापालिकेसाठी शिवसेनाच फेवरेट, भगवा फडकविण्याचे शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार करू या - राजेश क्षीरसागर
schedule06 Dec 25 person by visibility 16 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : नेत्यांच्या निवडणुका झाल्या आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना ताकद द्या असे आदेश शिवसेना मुख्यनेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. कोणत्याही परिस्थिती महानगरपालिकेवर भगवा फडकविण्याची जबाबदार पदाधिकारी आणि शिवसैनिकांचीच आहे. महानगरपालिकेवर भगवा फडकविण्याचे स्वप्न शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आहे आणि ते पूर्ण करण्याची सुवर्णसंधी आताच्या निवडणुकीत शिवसैनिकांना मिळणार आहे. महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिल्या.
कोल्हापूर महानगरपलिका निवडणुकीच्या अनुषंगाने राजर्षी शाहू स्मारक भवन येथे शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा पार पडला. या मेळाव्यास शिवसैनिकांच्या गर्दीने शाहू स्मारक भवन परिसर व्यापून गेला. यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. "जय भवानी, जय शिवाजी", "शिवसेना जिंदाबाद", "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे" यांच्या जयघोषांनी परिसर दणाणून सोडला. मेळाव्याच्या सुरवातीस महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. आमदार क्षीरसागर यांनी, झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसह महायुतीला घवघवीत यश मिळाले. या यशाचे सर्व श्रेय शिवसैनिकांचे आणि महायुतीसाठी रात्रदिवस झटलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांच आहे. शिवसेनेचा महापौर झाला पाहिजे ही भावना सर्वांचीच आहे. माझ्यासाठी कार्यकर्त्यांनी जीवाच रान केले आता हि निवडणूक कार्यकर्त्यांची आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना बळ देणे माझं कर्तव्य आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्याचे काम केले. गेल्या ५ वर्षात महायुतीकडून झालेले काम कॉंग्रेसला अखंड हयातीत जमलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०४७ साली देश महासत्ता बनण्याचे स्वप्न बघत आहे. महापालिकेसाठी शिवसेनाच फेवरेट आहे. व्यासपीठावर पाहिले तर बरेच भावी नगरसेवक दिसून येथील त्यात महत्वाचे म्हणजे यापूर्वी महानगरपालिकेत सत्तेतील प्रमुख आणि विरोधी पक्षातील प्रमुख हे दोघेही शिवसेनेत आहेत. त्यांचा महापालिकेतील अनुभव आता शिवसेनेकडे आहे. त्यावरून शिवसेनेची ताकत समजून येईल,
शिवसेना उपनेत्या माजी आमदार श्रीमती जयश्री जाधव यांनी, इच्छुकांची संख्या शिवसेनेकडे सर्वाधिक आहे. उमेदवारी कोणालाही मिळो धनुष्यबाण हाच आपला उमेदवार समजून प्रत्येकाने काम करावे, असे आवाहन केले. शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शिवसेना जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, शारंगधर देशमुख, शिवाजीराव जाधव, हर्षल सुर्वे आदींची भाषणे झाली. मेळाव्यास जिल्हा संघटक विनायक साळोखे, शहरप्रमुख रणजीत जाधव, महेंद्र घाटगे, रमेश खाडे, किशोर घाटगे, उदय भोसले, तुकाराम साळोखे, राहुल चव्हाण, रणजीत मंडलिक, दीपक चव्हाण, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, राहुल चव्हाण, रत्नेश शिरोळकर, रमेश पुरेकर, प्रकाश नाईकनवरे, संभाजी जाधव, अजित मोरे, अरविंद मेढे, दुर्गेश लिंग्रस, अजय इंगवले, अस्कीन आजरेकर, नेपोलियन सोनुले, प्रसाद चव्हाण, पियुष चव्हाण, आदर्श जाधव, कृष्णा लोंढे, प्रशांत साळुंखे, अश्विन शेळके, महिला आघाडीच्या मंगलताई साळोखे, पवित्र रांगणेकर, अमरजा पाटील आदी उपस्थित होते.