Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिपच्या ११०० शाळा बंद, प्राथमिकचे जवळपास सात हजार शिक्षक आंदोलनातशिक्षकांच्या मोर्चाला प्रचाराचं वारं ! पदवीधर –शिक्षकमधील इच्छुकांनी साधली संपर्काची संधी !!कोल्हापुरात आठ - नऊ डिसेंबरला स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन ! स्पर्धेचे नोडल सेंटर म्हणून केआयटीला चौथ्यांदा मान !!पाणी पुरवठा संस्थांच्या ट्रान्सफार्मरची चोरी, पोलिसांकडून तपासात दुर्लक्ष !  इरिगेशन फेडरेशनचे सोमवारी आंदोलन !!कोल्हापुरात होणार सुषिर महोत्सव, नामवंत कलाकारांचा सहभागमार्केट सेसच्या विरोधात व्यापाऱ्यांचा बंद ! कलेक्टर ऑफिस समोर निदर्शने !!एकच मिशन -सक्तीची टीईटी रद्द ! शाळा बंद - शिक्षक रस्त्यावर, मोर्चाने कलेक्टर ऑफिसवर धडक !!भ्रम फोडणारा समाजच खरी संस्कृती निर्माण करतो – डॉ. गणेश देवीटीईटीच्या सक्तीविषयी खासदार धैर्यशील मानेंनी वेधले लोकसभेत लक्षकोल्हापुरात महापालिका शाळेत साकारली स्मार्ट हॅपी क्लासरुम

जाहिरात

 

शिक्षकांच्या मोर्चाला प्रचाराचं वारं ! पदवीधर –शिक्षकमधील इच्छुकांनी साधली संपर्काची संधी !!

schedule05 Dec 25 person by visibility 57 categoryराजकीय

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : पुणे विभागीय शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला तब्बल वर्षभराचा कालावधी आहे. मात्र या दोन्ही मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची टीईटी विरोधातील मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी चढाओढ पाहावयास मिळाली. काहींनी आंदोलनाच्या प्रारंभापासून मोर्चात सहभागी झाले तर काहींनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत आपण आम्ही तुमच्यासोबत हे दाखवून दिले. मोर्चात शिक्षक व पदवीधर शिक्षकांची संख्या मोठी असल्याने संपर्काची ही संधी इच्छुकांनी साधली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तर इच्छुक उमेदवारांनी एकमेकांची चेष्टामस्करी केली. यामुळे शुक्रवारी, पाच डिसेंबर रोजी सक्तीच्या टीईटी विरोधातील मोर्चात ‘ पदवीधर –शिक्षक’निवडणुकीच्या प्रचाराचं वारं फिरत राहिले.

पुणे विभागीय पदवीधर व शिक्षक आमदारकीसाठी डिसेंबर २०२६ मध्ये मतदान होण्याची शक्यता आहे. सध्या या दोन्ही मतदारसंघातील निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. पाच जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या या मतदारसंघात जो सर्वाधिक मतदार नोंदणी करणार तो उमेदवारीचा भक्कम दावेदार असे सांगितले जाते. अद्याप पक्ष कोणता, उमेदवारी कोणाला हे सारे गुलदस्त्यात असताना इच्छुकांनी संपर्क अभियानवर भर दिला आहे. शिक्षकांच्या टीईटी सक्तीच्या विरोधातील मोर्चावेळी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील इच्छुकांनी शिक्षक व पदवीधरांशी संपर्क साधण्याची संधी दवडली नाही. पुणे शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व सध्या महाविकास आघाडीकडे आहे. विद्यमान आमदार जयंत आसगावरक हे शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यांनीही आपण पुन्हा लढायचं या इराद्याने तयारी करत आहेत. शिक्षकांच्या मोर्चात ते अग्रभारी होते.

 विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे हे महायुतीचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चा सुरू आहे. त्यांनी सगळया नेते मंडळीशी भेट घेऊन पाचही जिल्ह्यात संपर्क दौरे आखत आहेत. शुक्रवारी गावडे हे सातारा येथील शिक्षक मोर्चात सहभागी झाले. जिल्हा मध्वयर्ती बँकेचे संचालक विजयसिंह माने,कायम विना अनुदानित कृती समितीचे खंडेराव जगदाळे, शिक्षक नेते दादासाहेब लाड, बाबा पाटील हे शिक्षक मतदारसंघासाठी इच्छुक आहेत. २०२० मध्ये त्यांनी तयारी केली होती. मात्र कोल्हापुरातून एकच उमेदवार हा पॅटर्न समोर आला. आणि लाड, पाटील, व जगदाळे यांनी उमेदवारी मागे घेत आसगावकर यांना पाठिंबा दिला. यंदा मात्र आपण लढायचं म्हणून ते काम करत आहेत. मोर्चात ते समर्थक शिक्षकासोबत सहभागी झाले.

पुणे पदवीधर मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार कोण हा सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. क्रांती साखर कारखान्याचे प्रमुख शरद लाड यांची उमेदवारी प्रबळ मानली जाते. उमेदवारीचा शब्द मिळाल्याने त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असल्याचे वृत्त आहे. विद्यमान आमदार अरुण लाड यांचे ते चिरंजीव आहेत. अरुण लाड हे महाविकास आघाडीकडून निवडून आले होते. पुणे पदवीधरमधून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने तयारी करत आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांचे समर्थक आहेत. त्यांनी मतदार नोंदणीवर भर दिला आहे. शिक्षक व पदवीधर शिक्षकांशी निगडीत मोर्चाला लाड व माने यांनी पाठिंबा दिला.

……………….

इच्छुकांत चेष्टामस्करीहस्तांदोलन अन्

मोर्चा संपल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांत चेष्टामस्करी रंगली. पदवीधरमधील इच्छुक शरद लाड, भैया माने व शिक्षक मतदारसंघातील इच्छुक विजयसिंह माने एकत्र आले. एकमेकांशी हस्तांदोलन करत निवडणुकीच्या अनुषंगाने  चेष्टामस्करी झाली. भैया माने हे लाड यांच्याशी हस्तांदोलन करताना सध्या तरी आम्ही मित्र आहोत असे हसत हसत सांगितले. त्यावर लाड यांनी, आपण तिघेही महायुतीशी निगडीत आहोत. मित्र राहणार आहोत असे उत्तर दिले. दोघांच्या मध्ये उभारलेले विजयसिंह माने यांनी ‘मी दोघांच्या मध्ये उभा आहे, मला आमदारकीची जास्त संधी आहे.’असे उद्गार काढताच पुन्हा हंशा पिकला

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes