उत्तरेश्वर चौकात रंगली मिसळ पे चर्चा, राजेश क्षीरसागरांना मताधिक्क्य देण्याचा निर्धार
schedule08 Nov 24 person by visibility 330 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांना मताधिक्क्य देण्याचा निर्धार उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठेतील नागरिकांनी केला. उत्तरेश्वर पेठ येथील महादेव मंदिरनजीकच्या चौकात शुक्रवारी,सकाळी ‘मिसळ पे चर्चा’हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला समाजातील विविध घटकातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. पुष्कराज क्षीरसागर यांनी उपस्थितांशी संवाद साधत उमेदवार राजेश क्षीरसागर यांना निवडून द्या अशी विनंती केली.
यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी भाषण करताना, ‘राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारात आपण जोमाने काम करणार आहोत. मी व माझे सगळे सहकारी हे महायुतीचे उमेदवार क्षीरसागर यांच्या पाठीशी राहतील. महायुतीला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता क्षीरसागर हे नक्कीच विजयी होतील.’
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे म्हणाले, ‘शुक्रवार, पेठ उत्तरेश्लर पेठेने नेहमीच शिवसेनेला साथ दिली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला या भागातून २२०० मतांचे मताधिक्क्य होते. विधानसभा निवडणुकीत महायुतीतंर्गत शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांना प्रभागातील तरुण मंडळ, तालीम संस्थांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. महापुराची आपत्ती असो की कोरोनाचे संकट, प्रत्येक वेळी क्षीरसागर हे मदतीला धावले. जातपातीचा विचार न करता माणुसकीच्या नात्याने संकटग्रस्तांना सहकार्य केले.’
याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास, स्थायी समितीचे माजी सभापती नंदकुमार मोरे, उदय जगताप, प्रकाश गवंडी, किरण शिराळे, धनाजी आमते, सुरेश सुतार, विश्वास आयरेकर, उत्तरेश्वर तालीम संस्थेचे अध्यक्ष पिंटू काटकर, उत्सव समितीचे अध्यक्ष काटकर, विराज चिखलीकर, सतीश धरपणकर, अशोक राबाडे, सनी अतिग्रे, कुंदर ओतारी, रमेश साळोखे, महेश नलवडे भाजप महिला आघाडीच्या गायत्री राऊत यांच्यासह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.