Maharashtra News 1
Register

जाहिरात

 

क्रिडाई कोल्हापूरतर्फे दालन मंडप उभारणीस प्रारंभ

schedule17 Jan 26 person by visibility 42 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :पश्चिम महाराष्ट्रात बांधकाम व्यावसायिकांची शिखर संघटना असलेल्या क्रिडाई कोल्हाापूरतर्फे ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित वास्तू विषयक दालन प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ करण्यात आला.

क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत यांच्या हस्ते व दालनचे चेरमन महेश यादव, व्हाई चेरमन आदित्य बेडेकर,समन्वयक निखिल शाह क्रिडाईचे सेक्रेटरी गणेश सावंत, दालन सेक्रेटरी संग्राम दळवी  यांच्या उपस्थितीमध्ये मंडप उभारणीस सुरुवात झाली. के. पी. खोत व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते मंडप उभारणी कार्याचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी क्रिडाईचे अध्यक्ष खोत यांनी, संघटनेच्या ३५ वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा घेतला.  या कार्यक्रमास क्रिडाईचे उपाध्यक्ष प्रकाश देवालापूरकर, चेतन वसा, खजानिस अजय डोईजड, सह समन्वयक  पवन जामदार, संग्राम दळवी,अमोल देशपांडे, गौतम परमार, श्रीकांत पाटील, विजय माणगांवकर, केतन शाह, संदीप बोरचाटे, तुषार बेर्डे, क्रिडाई महाराष्ट्रचे उपाध्यक्ष विदयानंद बेडेकर, जेष्ठ सभासद कृष्णा पाटील, सुजय होसमनी, विवेकानंद पाटील,श्रेयांश मगदूम, शंकर गावडे, क्रिडाई कोल्हापूरचे सहखजानिस सागर नालंग, संचालक प्रदीप भारमल,सुनील चिले उपस्थित होते. दरम्यान या दालनचे प्लॅटिनम स्पॉन्सर - आर्या स्टील्स् रोलिंग प्रायव्हेट लिमिटेड, डायमंड स्पॉन्सर- इटाका सिरमिक्स, एसकॉन इस्पत प्रेस्टिज एल एल पी यांनी स्विकारले आहे. गोल्ड स्पॉन्सर (बिल्डर्स) केवेस्ट इन्फ्रा अँड हायवेस्ट डेव्हलपर्स तर गोल्ड स्पॉन्सर- अविष्कार इन्फ्रा, मोटो टाईल्स, स्टेट बँक ऑफ इंडिया, यश पॉली, सिम्पोलो टाईल्स यांच्याकडे आहे. सिल्वर स्पॉन्सर- विन्डो एक्स्पर्ट , एच आर विंडटेक ( व्ही इ के प्रा. ली., तेजस इंडस्ट्रिज युनियन बँक ऑफ इंडियाकडे आहे.  सेमी कॉ स्पॉन्सर फेराकॉल, स्मॅश इलेव्हटर , बँक ऑफ इंडिया, एनएन आयटी कार पार्किंग सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड, वोक्स इंटेरियर आणि एक्सटेरियर  सोलुशन प्रायव्हेट लिमिटेड, हायड्रा पार्क, ग्रेट व्हाईट ग्लोबल,  पॅरीवेअर रोका, लिशा स्वीचेस, ओटीस इलेव्हटर्स,  कोने इलेव्हटर्सची दालन यशस्वी होण्यासाठी मदत  लाभली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes