सोमवारपासून राजेश चषक टी 20 ओपन लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा
schedule07 Mar 25 person by visibility 359 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापुरातील शाहूपुरी जिमखाना मैदानावर 10 ते 16 मार्च 2025 या कालावधीत राजेश चषक टी ट्वेन्टी ओपन लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित केले आहे. या स्पर्धेमध्ये कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण आठ संघांचा सहभाग आहे अशी माहिती पुष्कराज क्षीरसागर व अनिल शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
शांद फाउंडेशनच्यावतीने या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सहकार्य लाभले आहे. दरम्यान या स्पर्धेत कोल्हापूरचे चार संघ सहभागी होणार आहेत सोमवारी 10 मार्च रोजी सकाळी नऊ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये स्पर्धेचे उद्घाटन होईल. स्पर्धेतील प्रथम विजेता संघास पंच्याहत्तर हजार रुपये व राजेश चषक तर उपविजेते संघास 51 हजार रुपये व राजेश चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू ठरलेल्या मालिकावीर खेळाडूस रोख पाच हजार रुपये, संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ठरलेल्या खेळाडूला रोख तीन हजार रुपये उत्कृष्ट गोलंदाज ठरलेल्या खेळाडूला तीन हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल तसेच प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू सामनावर म्हणून एक हजार रुपये बक्षीस आहे. प्रत्येक खेळाडूंना टी-शर्ट व किट देण्यात येणार आहे. स्पर्धेतील अंतिम सामना 16 मार्च रोजी आहे. अंतिम सामना झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजता राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ आहे.
कोल्हापूरकरांनी या स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहित करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. पत्रकार परिषदेवर मधु बामणे, योगेश सूर्यवंशी, राजाराम कुलकर्णी, प्रकाश माजगावकर, प्रसाद मिरासी, प्रतीक जामसांडेकर, मुकुंद यादव, रणजीत इंदूलकर आदी उपस्थित होते.