+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustगजापुरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संसारोपयोगी साहित्याचे वाटप, दहा लाखाची आर्थिक मदत adjust केआयटीतील संशोधनाचा दर्जा आता आंतरराष्ट्रीय स्तराचा होणार, अनुभवी प्राध्यापक सहभागी adjustशिवभक्तांवरील गुन्हे मागे घ्या-धनंजय महाडिकांनी घेतली फडणवीसांची भेट adjustएनआयटीचे विद्यार्थी तंत्रशिक्षण बोर्डाच्या परीक्षेत अव्वल adjustजरग विद्यामंदिरमध्ये नानासो जरग यांना श्रद्धांजली adjustकोल्हापुरात ट्रक महोत्सव उत्साहात ! चेतन मोटर्स - टाटा मोटर्सचा पुढाकार !! adjustबालिश नेत्याची मुलं विशाळगड आंदोलनात का नव्हती ? सतेज पाटलांचा खासदार महाडिकांना टोला adjustसदभावना रॅलीतून प्रकटला सामाजिक एकोप्यावरील विश्वास adjustशहरातील पाणी पुरवठासंबंधी भाजप नगरसेवकांची अधिकाऱ्यांसोबत मॅरेथॉन बैठक adjustमहायुती, महाविकासला पर्याय परिवर्तन आघाडी ! पुण्यात विविध संघटना नेत्यांची बैठक !!
1000621806
1000615695
1000597139
1000567748
1000562876
1000551727
schedule09 Jul 24 person by visibility 452 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. एस.आर. यादव यांची इंडियन नॅशनल सायन्स अॅकॅडमी (इन्सा) या प्रतिष्ठित राष्ट्रीय संस्थेकडून मानद शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली. या निवडीबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी काल विद्यापीठ कार्यालयात त्यांचे ग्रंथभेट देऊन अभिनंदन केले. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व डॉ. राजाराम गुरव.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, डॉ. यादव यांनी वनस्पतीशास्त्रामध्ये जागतिक दर्जाचे संशोधन करून शिवाजी विद्यापीठाचा नावलौकिक उंचावला आहे. सेवानिवृत्तीनंतर सुद्धा त्यांनी आपल्या संशोधन कार्यात खंड पडू दिलेला नाही, ही सर्वच क्षेत्रांतील संशोधकांसाठी आदर्शवत बाब आहे. त्यांच्या या निवडीचा विद्यापीठास नितांत अभिमान आहे.
डॉ. यादव म्हणाले, आजवर मी जे थोडेफार संशोधन करू शकलो आहे, त्यामध्ये शिवाजी विद्यापीठ या माझ्या मातृसंस्थेचा मोलाचा वाटा आहे. भावी काळातही वनस्पतीशास्त्रातील संशोधन अव्याहत करीत राहण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि वनस्पतीशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. राजाराम गुरव उपस्थित होते.डॉ. यादव हे सध्या विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागात इन्सा वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत आहेत. त्यानंतर आता ‘इन्सा’कडून त्यांची मानद शास्त्रज्ञ म्हणून तीन वर्षांसाठी नियुक्ती झाली आहे. पुढे आणखी दोन वर्षे मुदतवाढही मिळू शकते. या सन्मान प्राप्त करणारे विद्यापीठातील ते पहिले शास्त्रज्ञ आहेत. या अंतर्गत त्यांना संशोधनविषयक बाबींसाठी एक लाख रुपयांचे अनुदानही प्राप्त होणार आहे.