Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
स्वातंत्र्यदिनापासून धावणार ई बसेस ! कोल्हापुरात होणार सिमेंटचे रस्ते !! कोल्हापूर जिल्ह्यातील २५१ गावांना ७६ कोटी मंजूरमहापुराच्या उपाययोजनेसंबंधी दोन खासदार, सात आमदारांचे जलसंपदामंत्र्यांना पत्रऋतुराज पाटील यांच्यावर वाढदिवसानिमित शुभेच्छाचा वर्षावगोकुळची निवडणूक महायुती म्हणून लढणार, मंत्री मुश्रीफ आमच्या सोबत असतील - धनंजय महाडिकवडिलांना मिठी मारताच नवीद मुश्रीफ झाले भावूककोल्हापूर महानगर भाजप अध्यक्षपदी विजय जाधवस्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडी सरसावली, नेतेमंडळीची पदाधिकाऱ्यांच्यासोबत संयुक्त बैठक जागतिक स्तरावरील कॅन्सर उपचार आता कोल्हापुरात !णणजझ त

जाहिरात

 

कोल्हापूर परिमंडळाच्या मुख्य अभियंतापदी परेश भागवत

schedule17 Aug 21 person by visibility 1007 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :महावितरणच्या कोल्हापूर परिमंडळाच्या मुख्य अभियंतापदी परेश भागवत रूजू झाले आहेत. यापूर्वी ते मुख्य अभियंता या पदावर प्रकाशगड मुख्यालयात कार्यरत होते. त्यांना विद्युत क्षेत्रात २४ वर्षे सेवेचा प्रदीर्घ अनुभव आहे. भागवत हे कोल्हापूर जिल्ह्यातील पाचगाव या गावचे मूळ रहिवासी आहेत. त्यांनी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली येथून विद्युत आभियांत्रिकी शाखेत पदवी प्राप्त केली आहे. वित्त व्यवस्थापन शाखेतील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले आहे.
ते १९९७ मध्ये तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंता म्हणून सेवेत दाखल झाले. रत्नागिरी परिमंडळातील कुडाळ विभागामध्ये कनिष्ठ अभियंता या पदावर ते रुजू झाले. त्यांनी १९९९ ते २००६ या कालावधीत कोल्हापूर शहर व ग्रामीण विभागात सेवा बजाविली आहे. ऑगस्ट २००६ मध्ये सरळ सेवेने त्यांची निवड कार्यकारी अभियंता या पदावर झाली. रत्नागिरी परिमंडळात नवनिर्मित खेड विभागाचा कार्यभार त्यांनी सांभाळला. २००७ ते २०११ पर्यंत ते भिवंडी येथील टोरंटो पॉवर डिस्ट्रीब्युशन फ्रँचाईजीत सहाय्यक महाव्यवस्थापक या पदावर ते प्रतिनियुक्तीवर होते. त्यांनी जानेवारी २०१२ ते जुलै २०२१ या कालावधीत कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता व मुख्य अभियंता या पदावर महावितरणच्या प्रकाशगड येथील मुख्य कार्यालयात विविध विभागाची जबाबदारी पार पाडली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes