Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषदेत गणरायाची प्रतिष्ठापना !  सदस्य - पदाधिकाऱ्यांचा पुढाकार, आरतीला मंत्र्यांची उपस्थिती ! !आनंदराव पाटील- चुयेकरांच्या समाधीला माजी संचालकांचे अभिवादनगोकुळच्या जागा वाटपावरुन महायुतीत वादाचे फटाके! मंत्री मुश्रीफ हे भाजपची ताकत गौण असल्याचा संदेश देत आहेत का? खासदार महाडिकांचा सवालडॉ. शिवशंकर मारजक्के यांचा अॅवार्ड ऑफ एक्सलन्सने सन्मानशिक्षकांचा सन्मान की निवडणुकीचा शो ?जनसुराज्य शक्तीचे नवे पदाधिकारी, युवक जिल्हाध्यक्षपदी अक्षय जरग ! शहराध्यक्षपदी शेखर जाधव, माजी नगरसेवक आर.डी.पाटील जनसुराज्यमध्ये ! !अचानक शाळा भेटी ! पायाभूत सुविधा, गुणवत्तेची तपासणी ! !कौस्तुभ गावडेंची भूमिका शिक्षकहिताची, त्यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री, पार्लमेंटरी बोर्डाकडे आग्रह धरणार - खासदार धनंजय महाडिकडी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये युवावर्स उत्साहातउजळाईवाडी ग्रामपंचायतीच्या कारभारात अनियमितता, करवीर पंचायत समितीसमोर उपोषणाचा इशारा- राजीव माने

जाहिरात

 

रोटरी क्लब ऑफ गार्गीजतर्फे हॉटेल सयाजीत यामिनी प्रदर्शन

schedule16 Sep 25 person by visibility 421 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  रोटरी क्लब ऑफ गार्गींजतर्फे १९ ते २१ सप्टेंबर २०२५ या कालावधीत हॉटेल सयाजीमधील मेघ मल्हार हॉल येथे  यामिनी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. अशी माहिती क्लब अध्यक्षा अंजली मोहीते, इव्हेन्टचे चेअरमन बिना जनवाडकर, को-चेअरमन डॉ. हेमलता कोटकर, सेक्रेटरी सविता पदे, रोटरी सदस्य सौ. साधना घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 प्रदर्शनाचे हे बारावे यशस्वी वर्ष असून या वर्षी प्रदर्शनात पुणे येथील एक्सकॅलुसिव्ह रिअल ज्वेलर्स विथ युनिक डिझाइन्स, मुंबई पोल्की, रिअल डायमंड्स, लॅबग्रोन डायमंड्स, संपूर्ण भारतामधील तसेच इंदोर, जयपूर, गोआ, बेंगलोर, दिल्ली येथील विविध प्रकारच्या होम डेकोर्स फॉर फेस्टीव्हस स्टॉल्स असे १०० हुन अधिक स्टॉल्स असलेले हे यामिनी प्रदर्शन भरविण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन डी. वाय. पाटील ग्रुपच्या शांतादेवी डी. पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आमदार सतेज पाटील,डी वाय पाटील ग्रुपचे संजय डी. पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील डिस्ट्रिक गव्हर्नर अरुण भंडारी, असिस्टंट गव्हर्नर हर्षवर्धन तायवडे पाटील, रोटरी मुव्हमेंट कोल्हापूरचे प्रेसिडेंट रो. शितल दुगे यांची उपस्थिती असणार आहे.

हे प्रदर्शन १९ सप्टेंबर रोजी दुपारी ४ ते रात्री ९ आणि  २० व २१ सप्टेंबर  रोजी सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सुरू राहणार आहे. प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी   क्लबच्या अध्यक्षा अंजली मोहिते,  डॉ.हेमलता कोटकर, बिना जनवाडकर, सविता पदे साधना घाटगे, शोभा तावडे, यामिनीच्या सदस्या रेणुका सप्रे, दीपिका कुंभोजकर, कल्पना घाडगे, गीता पाटील, योगिनी कुलकर्णी, जया महेश्वरी, सुरेखा इंग्रोळे, सुजाता लोहिया प्रयत्नशील आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes