शाळा बंद आंदोलनातील शिक्षक – कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात : शिक्ष्ण संचालकांचा आदेश
schedule03 Dec 25 person by visibility 15 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करणे व मार्च २०२४ मधील संच मान्यतेचा निर्णयाविरोधात राज्यभरातील मुख्याध्यापक संघ, शिक्षक संघटना, संस्था चालकांनी एकत्र येत पाच डिसेंबर २०२५ रोजी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. तसेच यादिवशी ज्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. दरम्यान राज्य सरकारच्या शिक्षण संचालनालयाने शाळा बंद आंदोलनात सहभागी होणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा दिला आहे. जे शिक्षक व कर्मचारी शाळा बंद आंदोलनात सहभागी होतील त्या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याची कार्यवाही करावी अशा सूचना विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना केल्या आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणेचे संचालक महेश पालकर यांनी राज्यभरातील शिक्षण उपसंचालक व शिक्षण संचालकांना यासंबंधीच्या सूचना दिले आहेत. तसेच पाच डिसेंबर रोजी कोणतीही शाळा बंद राहणार नाही याची आपल्या स्तरावरुन दक्षता घ्यावी असेही पालकर यांनी अधिकाऱ्यांना कळविले आहे.