Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
राजकारण्यांच्यापेक्षा लोकांसाठी झटणारी समाजरत्ने समाजासमोर झळकली पाहिजेत-प्रकाश आबिटकरमॅनेजमेंटसाठी पाच अर्ज वैध, भाटियांचा अर्ज अवैध ! हंगेरगीकरांच्या उमेदवारीला सुटाचा आक्षेप !कर्करोग उपचारांसाठी चुंबकीय नॅनो कणांच्या निर्मितीसाठी पेटंट ! सरकारने गरिबांच्या शिक्षणाचे दायित्व निभवावे- पुरोगामीचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटीलप्रा. दत्ता जाधव यांना पीएचडीराष्ट्रीय स्तरावरील हँडबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाची दमदार कामगिरीव्यवसाय परवाना दरवाढीला व्यावसायिकांचा विरोध ! महापालिका अन् चेंबर ऑफ कॉमर्स आमनेसामने !!बुधवारपासून चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा, सर्वाधिक बक्षीसाची स्पर्धा शिवाजी विद्यापीठ मॅनेजमेंट कौन्सिलच्या दोन जागेसाठी सहा अर्जदूध विक्रीत गोकुळचा नवा रेकॉर्ड ! कर्मचाऱ्यांनी केला चेअरमनांचा सत्कार

जाहिरात

 

जरगनगर विद्यामंदिरात पटसंख्येची गुढी, पहिलीचा प्रवेश ४०० पार ! शाळेच्या शीर्षक गीताचे अनावरण !!

schedule30 Mar 25 person by visibility 577 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर जरगनगर शाळेच्या इयत्ता पहिलीच्ी प्रवेश प्रक्रिया उत्साहात पार पडली. स्कॉलरशिपमध्ये महाराष्ट्रभर स्वतःचा "जरगनगर पॅटर्न"म्हणून नावलौकिक मिळवलेल्या या शाळेचे इयत्ता पहिलीचे प्रवेश प्रतिवर्षाप्रमाण यंदाही गुढीपाडव्याच्या दिवशी हाऊसफुल ठरले. इयत्ता पहिलीसाठी ४०७ पालकांनी प्रवेश अर्ज स्वीकारला व इयत्ता दुसरी ते इयत्ता सातवीसाठी १३५ विद्यार्थ्यांची नावे नोंद झाली. दरम्यान प्रवेश मर्यादा संपल्याने बऱ्याच पालकांना प्रवेश देता आला नाही.

सकाळी आठ वाजता प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला. प्रारंभी, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व लक्ष्मीबाई जरग यांच्या प्रतिमेचे पूजन व शाळेच्या गुणवत्तेच्या गुढीचे पूजन झाले. मुख्याध्यापिका नीता ठोंबरे यांनी भाषणातून शाळेच्या शैक्षणिक कामगिरीचा चढता आलेख मांडला. याप्रसंगी शाळेच्या प्रगतीमध्ये भरीव योगदान देणाऱ्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या हस्ते प्रवेश प्रक्रियेचा प्रारंभ झाला. कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे, पत्रकार गुरुबाळ माळी, विजय कुंभार, बाळासाहेब काळे, आप्पासाहेब माळी, पी. ए. पाटील, पोपट पवार, प्रकाश पाटील यांच्या हस्ते प्रवेश प्रक्रिया पार पडली.

माजी शैक्षणिक पर्यवेक्षिका विमल गवळी, नाना जरग सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत जरग, जगर फाऊंडेशनच्या वैभवी जरग, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष संध्या देवडकर, सदस्य अनिश जरग, रुद्र जरग, आदित्य जरग यांच्या हस्ते विविध परीक्षेत यश संपादित मुलांचा गौरव झाला. मान्यवरांच्या हस्ते ‘शाळा भरली जरगनगरची’ या शीर्षक गीताचे अनावरण झाले. शिक्षिका सरिता सुतार यांनी गीतलेखन केले आहे. शिक्षक शिवाजी मेथे –पाटील यांनी शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली.  शिक्षक संदिप जाधव यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षक युवराज सरनाईक यांनी आभार मानले. याप्रसंगी माजी उपमहापौर सुनील पाटील, शिक्षक सुनील पाटील, मनोहर सरगर, स्मिता कारेकर, अमित पोटकुले, विजय सुतार, किरण माळी, पुष्पा गायकवाड आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes