Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषदेत गणरायाची प्रतिष्ठापना !  सदस्य - पदाधिकाऱ्यांचा पुढाकार, आरतीला मंत्र्यांची उपस्थिती ! !आनंदराव पाटील- चुयेकरांच्या समाधीला माजी संचालकांचे अभिवादनगोकुळच्या जागा वाटपावरुन महायुतीत वादाचे फटाके! मंत्री मुश्रीफ हे भाजपची ताकत गौण असल्याचा संदेश देत आहेत का? खासदार महाडिकांचा सवालडॉ. शिवशंकर मारजक्के यांचा अॅवार्ड ऑफ एक्सलन्सने सन्मानशिक्षकांचा सन्मान की निवडणुकीचा शो ?जनसुराज्य शक्तीचे नवे पदाधिकारी, युवक जिल्हाध्यक्षपदी अक्षय जरग ! शहराध्यक्षपदी शेखर जाधव, माजी नगरसेवक आर.डी.पाटील जनसुराज्यमध्ये ! !अचानक शाळा भेटी ! पायाभूत सुविधा, गुणवत्तेची तपासणी ! !कौस्तुभ गावडेंची भूमिका शिक्षकहिताची, त्यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री, पार्लमेंटरी बोर्डाकडे आग्रह धरणार - खासदार धनंजय महाडिकडी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये युवावर्स उत्साहातउजळाईवाडी ग्रामपंचायतीच्या कारभारात अनियमितता, करवीर पंचायत समितीसमोर उपोषणाचा इशारा- राजीव माने

जाहिरात

 

न्यू कॉलेज ऑफ फार्मसीचा उंचगावमध्ये स्वच्छता उपक्रम

schedule14 Aug 26 person by visibility 605 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू कॉलेज ऑफ फार्मसी व उंचगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत उंचगाव येथे स्वच्छता सप्ताहा निमित्त दि. १४ ऑगस्ट रोजी स्वच्छता अभियानाचे नियोजन करण्यात आले होते. या अभियानाच्या अंतर्गत महाविद्यालयाच्या डी फार्मसी व बी फार्मसीच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत मंगेश्वर मंदिर परिसर, गाव तलाव येथे परिसराची स्वच्छता केली. लोकांमध्ये जनजागृती करून स्वच्छतेचे महत्व पटवून दिले तसेच परिसरात स्वच्छता न बाळगल्यास त्याचा आरोग्यावर कसा परिणाम होतो. याविषयी पथनाट्याद्वारे प्रबोधन केले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून  सरपंच मधुकर चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य नामदेव वाईगडे,  रशीद पठाण आदी उपस्थित होते. उपक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र कुंभार, प्रा. वैशाली यादव, प्रा. काजल मोहिते, प्रा. अंजली महाडिक, प्रा. साक्षी माने, प्रा. राजेश कुलकर्णी व  सीमा पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes