Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषदेत गणरायाची प्रतिष्ठापना !  सदस्य - पदाधिकाऱ्यांचा पुढाकार, आरतीला मंत्र्यांची उपस्थिती ! !आनंदराव पाटील- चुयेकरांच्या समाधीला माजी संचालकांचे अभिवादनगोकुळच्या जागा वाटपावरुन महायुतीत वादाचे फटाके! मंत्री मुश्रीफ हे भाजपची ताकत गौण असल्याचा संदेश देत आहेत का? खासदार महाडिकांचा सवालडॉ. शिवशंकर मारजक्के यांचा अॅवार्ड ऑफ एक्सलन्सने सन्मानशिक्षकांचा सन्मान की निवडणुकीचा शो ?जनसुराज्य शक्तीचे नवे पदाधिकारी, युवक जिल्हाध्यक्षपदी अक्षय जरग ! शहराध्यक्षपदी शेखर जाधव, माजी नगरसेवक आर.डी.पाटील जनसुराज्यमध्ये ! !अचानक शाळा भेटी ! पायाभूत सुविधा, गुणवत्तेची तपासणी ! !कौस्तुभ गावडेंची भूमिका शिक्षकहिताची, त्यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री, पार्लमेंटरी बोर्डाकडे आग्रह धरणार - खासदार धनंजय महाडिकडी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये युवावर्स उत्साहातउजळाईवाडी ग्रामपंचायतीच्या कारभारात अनियमितता, करवीर पंचायत समितीसमोर उपोषणाचा इशारा- राजीव माने

जाहिरात

 

आता मुख्याध्यापक होणार माहितीतज्ञ ; यशदा - माध्यमिक शिक्षण विभागाचा विशेष कार्यक्रम  

schedule14 Aug 26 person by visibility 639 categoryशैक्षणिकजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर   :   माहिती अधिकाराचीच माहिती नसल्याने मुख्याध्यापकांची अनेकदा त्रेधा उडत असते ही परिस्थिती लक्षात घेऊन माध्यमिक शिक्षण विभाग आणि यशदा, पुणे यांच्या वतीने माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या अनुषंगाने माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची कार्यशाळा गडकरी हॉल येथे आयोजित करण्यात आली होती . या कार्यशाळेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील १००० माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापकांना माहितीचा अधिकार, त्याची अंमल बजावणी याबरोबरच प्रशासकीय कर्तव्याचे उत्तरदायित्व यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले . यशदाचे संशोधन अधिकारी तथा मार्गदर्शिका  रेखा साळुंखे, मार्गदर्शक दादू बुले यांनी माहिती अधिकारातील माहिती तपासून तो निकालात कसा काढावा यासह जनमाहिती अधिकाऱ्याची भूमिका विषद केली. साळुंखे यांनी माहितीचा अधिकार हा मुलभूत अधिकार असून प्रत्येक नागरिकास कोणत्याही प्रकारची माहिती मागता येते . तो त्याचा हक्क आहे . एखादे परिपत्रक निघाले आणि त्याचा आधार घेऊन माहिती नाकारणे हा दंडनीय अपराध आहे . एखादे परिपत्रक मार्गदर्शक ठरू शकते मात्र ते कायद्याच्या पातळीवर टिकू  शकत नाही . माहिती देणे टाळण्यापेक्षा लोकहित लक्षात घेऊन माहिती देणे केंव्हाही चांगलेच असेही त्यांनी सांगितले. मार्गदर्शक दादू बुले यांनी सार्वजनिक प्राधिकरण कसे ओळखावे याबरोबरच सर्वसामान्य नागरिक हा व्यवस्थेचा मालक असून शाळा चालक हे विश्वस्त आहेत याची जाणिव करून देतानाच माहितीचा सांभाळ करणे ही त्यांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले. अर्ज निकाली काढणे आणि अपीलाची प्रक्रिया यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. प्रारंभी उपशिक्षणाधिकारी अजय पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात मुख्याध्यापकांना सजग करतानाच विविध समित्यांची माहिती, सरल पोर्टलवरच्या नोंदी, सेल्फि विथ तिरंगा, युथ फर्स्ट मॅरेथॉन व त्यातील आभासी सहभाग तसेच विद्यांजली पोर्टलवरील विद्यार्थी उपस्थिती नोंद यासंदर्भात माहिती देतानाच माहिती अधिकाराचे प्रशिक्षण घेणा-या मुख्याध्यापकांना चिंता न करता गुंता कसा सोडवावा याचे मार्गदर्शन केले.  याप्रसंगी विनाअनुदान कृती समितीचे मुख्याध्यापक खंडेराव जगदाळे, मुख्याध्यापक संघाचे सचिव आर . वाय. पाटील, मुख्याध्यापक प्रकाश सुतार, संजय सौंदलगे, धनाजी बेलेकर, सुरेखा पोवार, मनिषा पाटील, माधवी सौंदलगे, सुधाकर सातवेकर, विजय भोगम, पद्मिनी माने, अश्विनी पाटील  उपस्थित होते .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes