Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषदेत गणरायाची प्रतिष्ठापना !  सदस्य - पदाधिकाऱ्यांचा पुढाकार, आरतीला मंत्र्यांची उपस्थिती ! !आनंदराव पाटील- चुयेकरांच्या समाधीला माजी संचालकांचे अभिवादनगोकुळच्या जागा वाटपावरुन महायुतीत वादाचे फटाके! मंत्री मुश्रीफ हे भाजपची ताकत गौण असल्याचा संदेश देत आहेत का? खासदार महाडिकांचा सवालडॉ. शिवशंकर मारजक्के यांचा अॅवार्ड ऑफ एक्सलन्सने सन्मानशिक्षकांचा सन्मान की निवडणुकीचा शो ?जनसुराज्य शक्तीचे नवे पदाधिकारी, युवक जिल्हाध्यक्षपदी अक्षय जरग ! शहराध्यक्षपदी शेखर जाधव, माजी नगरसेवक आर.डी.पाटील जनसुराज्यमध्ये ! !अचानक शाळा भेटी ! पायाभूत सुविधा, गुणवत्तेची तपासणी ! !कौस्तुभ गावडेंची भूमिका शिक्षकहिताची, त्यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री, पार्लमेंटरी बोर्डाकडे आग्रह धरणार - खासदार धनंजय महाडिकडी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये युवावर्स उत्साहातउजळाईवाडी ग्रामपंचायतीच्या कारभारात अनियमितता, करवीर पंचायत समितीसमोर उपोषणाचा इशारा- राजीव माने

जाहिरात

 

अधिकारी बदलले, प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालाला मुहूर्त लागेना ! सादरीकरणासाठी रोज नवीन तारीख ! !

schedule13 Aug 26 person by visibility 391 categoryजिल्हा परिषद

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन :  पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी चौकशीचे आदेश दिलेशिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांच्या कामकाजाच्या विरोधात सतरा मुद्यांचे पत्र जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांच्याकडे दिलेसीईओ जॅसमिन यांनी त्रिसदस्यीत समिती चौकशीसाठी नेमलीसमिती नेमून जवळपास एक महिना होत आलासमितीने  चौकशी पूर्ण केलाअहवाल तयार केलामात्र काही तांत्रिक कारणामुळे तो अहवाल सीईओ डॉ. जॅसमिन यांच्याकडे सादर झाला नाहीअहवाल परिपूर्ण असावा, त्यामध्ये त्रुटी असू नयेत म्हणून रोज त्या अहवालावर चर्चा सुरू आहे. शिक्षणाधिकाी डॉ. शेंडकर यांच्या संदर्भातील चौकशी अहवाल सादर होण्यास मुहूर्त लागेना. यामुळे अहवाल सादर होण्यासाठी रोज नवी तारीख उजाडत आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातर्फे जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवडयात पदोन्नती प्रक्रिया राबविली. मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख पदावर जवळपास २५० जणांच्या पदोन्नती झाल्या. स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्यांना पदोन्नतीत संधी मिळाली. त्या पदोन्नत्या वगळता अन्य काही पदोन्नतीसंबंधी तक्रारी झाल्या. साऱ्याच शिक्षक संघटनांनी पदोन्नती प्रक्रियेला विरोध केला.पदोन्नतीमध्ये सहा वर्षे सेवा झालेल्यांना बढती आणि तीस वर्षे सेवा झालेले बाजूला असा प्रकार घडल्याचे शिक्षक संघटनेच्या नेत्यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह जिल्हा परिषदेतील पदाधिकारी व सीईओंना सांगितले. पदोन्नती प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी केली.

वाढत्या तक्रारींची दखल घेत पालकमंत्री आबिटकर यांनी १३ जुलै रोजी पदोन्नती प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश दिले. त्याचवेळी त्यांनी डॉ. जॅसमिन यांच्याकडे प्राथमिक शिक्षणाधिकारी शेंडकर यांच्या कामकाजासंबंधी १७ तक्रारींचे पत्र दिले. त्या अनुषंगाने चौकशी करण्याचे आदेश दिले. सीईओ जॅसमिन यांनी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी अनुराधा म्हेत्रे यांची चौकशी समिती नेमली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जोशी यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने चौकशीचे काम केले. आठ दिवसापूर्वी चौकशी अहवाल तयार झाला असल्याचे वृत्त आहे. अद्याप तो अहवाल, सीईओंकडे सादर झाला नाही. कारण या अहवालात कुठल्याही स्वरुपाच्या त्रुटी राहू नयेत म्हणून पुन्हा, पुन्हा त्यावर काम केले जात असल्याच वृत्त आहे. चौकशी समितीतील काही अधिकाऱ्यांची, सीईओ डॉ. जॅसमिन यांच्याशी चर्चा झाली. गेल्या चार दिवसात दोन वेळा वरिष्ठ अधिकाऱ्यांत चर्चा होऊन अहवाल परिपूर्ण असावा, कोणत्याही त्रुटी राहू नयेत या अनुषंगाने चर्चा झाल्याचे वृत्त आहे. आस्थापनांशी निगडीत कामकाज व सरकारच्या विविध योजनेतील अंमलबजावणी अशा दोन घटकांवर फोकस ठेवून चौकशी झाली. मात्र अहवाल सादर होण्यासाठी मुहूर्त लागेना अशी स्थिती आहे. अहवाल सादर करण्याची तारीख पुढे पुढे जात आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी बदलले आहेत.

………………

जिपला नवे प्राथमिक शिक्षणाधिकारी, डॉ. शेंडकरांचे मुख्यालय शिक्षण आयुक्तालय पुणे  

राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने परभणी येथील अशोक उद्धवराव घुगे यांच्याकडे कोल्हापूर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षणाधिकारीपदाचा स्वतंत्र कार्यभार सोपविला आहे. त्यांच्याकडे तीस आठवडयासाठी हा प्रशिक्षण कालावधी आहे. या कालावधीत घुगे हे प्राथमिक शिक्षणाधिकारीपदाचा स्वतंत्र कार्यभार पाहणार आहेत. दरम्यान प्राथमिक शिक्षणाधिकारीपदाचा स्वतंत्र कार्यभार घुगे यांच्याकडे सोपविल्यामुळे शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांच्या पदस्थापनेकडे लक्ष लागले होते. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अवर सचिव सिद्धार्थ घोरपडे यांनी एका आदेशान्वये, डॉ. मीना शेंडकर यांची इतरत्र पदस्थापना होईपर्यंत त्यांचे मुख्यालय हे शिक्षण आयुक्तालय पुणे येथे राहील असे म्हटले आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes