ऑर्केस्ट्रा कलावंतांच्या जीवनावरील पुस्तक वेगळी अनुभूती देईल
schedule14 Aug 26 person by visibility 21 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : ' खरं तर ऑर्केस्ट्रा प्लेयर्स सर्वसामान्यांच्या विविध प्रसंगांमध्ये आपली भूमिका संगीताची मेजवानी देऊन सातत्यपूर्वक बजावत असतात परंतु दुर्दैवाने त्यांच्या आयुष्यामध्ये संघर्ष हा कायमस्वरूपी पाहिला मिळतो याचाच धागा पकडून समाजकार्य विषयातील संशोधक विकास अवघडे व मार्गदर्शक डॉ दीपक भोसले यांच्या प्रयत्नातून या आर्केस्ट्रा प्लेयरच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे हे पुस्तक असून यात केवळ समस्यांची मांडणी नसून त्यावर उपायात्मक योजना देखील खूप चांगल्या रीतीने मांडलेल्या आहेत व या सूचना जर येणाऱ्या काळात अमलात आल्या तर काही अंशी या लोकांचे दुःख कमी होण्यास मदत होईल. तसेच या पुस्तकातून वेगळी अनुभूती घडेल .' असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर के कामत यांनी व्यक्त केले.
मेलोडी अँड चॅलेंजेस ऑफ ऑर्केस्ट्रा प्लेयर्स इन कोल्हापूर या डॉ दीपक भोसले व विकास अवघडे लिखित पुस्तकाच्या प्रकाशन नुकताच झाला. याप्रसंगी कुलगुरू कामत बोलत होते.
पुस्तकाचे सहलेखक विकास अवघडे यांनी प्रस्तावना सादर करताना या विषयातील माहिती संकलन करीत असताना आलेले आपले अनुभव मांडले. डॉ दीपक भोसले यांनी हे पुस्तक लिहिण्यामागील उद्देश स्पष्ट करताना अशा प्रकारचे संशोधन केवळ ग्रंथालयापुरतं मर्यादित न राहता ते समाजामध्ये पुस्तकाच्या स्वरूपात येणे गरजेचे असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले की जेणेकरून समाजाचा या घटकांकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली
या प्रकाशन कार्यक्रमाला डॉ अश्विनी बाटे, पीएचडी संशोधक माधुरी भाले, सायबरचे प्रशासकीय अधिकारी डॉ विनायक साळोखे यांची उपस्थिती होती कोल्हापुरातील ऑर्केस्ट्रा परिवारातील रवी सुतार, कुमार घोरपडे, राजू गोरड, मुकुंद सुतार, अमोल बुचडे, माधुरी बिरांजे,किशोर कुमार भारती, हिंदुराव अवघडे,संजय परब,यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सायबर संस्थेचे अध्यक्ष डॉ आर ए शिंदे, सचिव सीए ऋषिकेश शिंदे,संचालक, डॉ आर के टेलर यांचे प्रोत्साहन लाभले .