काश्मीरमधील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मुस्लिम बोर्डिंगतर्फे निदर्शने
schedule23 Apr 25 person by visibility 198 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जम्मू-काश्मीरमधील पहलगामजवळ अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याचा येथील मुस्लिम बोर्डिंगतर्फे निषेध करण्यात आला. निरपराध नागरिकांवर हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीच्या निषेधार्थ जोरदार घोषणा दिल्या. पाकिस्तानचा निषेध केला. जम्मू-काश्मीरमधील उमर अब्दुला सरकार बरखास्त करण्याची मागणी केली. दसरा चौक येथील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळयासमोर आंदोलन झाले. मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी, रफीक शेख, रफीक मुल्ला, हाजी लियाकत मुजावर, हाजी जहाँगीर अत्तार, बापू मुल्ला, हाजी शौकत मुतवल्ली, मौलाना मुबीन बागवान, फारुख पटवेकर, अल्ताफ झाँजी, अबू ताकीलदार बाबा साहेब मुल्लाणी, इक्बाल ताशिलदार, जिलानी शेख, वहिदा शिकलगार, सुचिता मंडलिक, नाझणीन मोमीन, नुजहत हिरोली, मरियम आगलावे, सादिया मलबारी, आलिया उस्ताद, मिसबाह पठाण, साबिया सिद्दीकी आदींचा आंदोलनात सहभाग होता.