नगर भूमापन अधिकारी शशिकांत पाटील यांना उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार
schedule06 Aug 25 person by visibility 44 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर नगर भूमापन अधिकारी शशिकांत लक्ष्मण पाटील (रा.शिराळे वारूण ता.शाहुवाडी) यांना महसूल विभागाच्या वतीने 'उत्कृष्ट अधिकारी' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पाटील यांनी कार्यालयात नागरिकांना ई महसूल प्रणालीचा जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी क्यूआर कोड स्कॅन करून माहिती प्राप्त करून घेणेकरिता कार्यालय आवारात माहिती फलक लावले आहेत. आपले सरकार पोर्टल वरील एक ही अर्ज प्रलंबित नाही.पीजी पोर्टल वरील तक्रारीचे निराकारण केले आहे. स्वामीत्व योजनेअंतर्गत सनद फी वसूल करण्यात आली आहे. कार्यालयात भू प्रणाम केंद्र स्थापन करून लोकांना तातडीने सेवा दिली जात आहे. मोजणीची व फेरफार कामे त्वरित केली जातात. कार्यालय सुसज्ज केले आहे. लोकांसाठी प्रतीक्षालय उभारले आहे.स्वच्छतागृह व पिण्याची पाण्याची व्यवस्था केली आहे.या सर्व कामांची दखल घेऊन पाटील यांना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गौरविले.