कृष्णराज महाडिकांची कोल्हापुरात जल्लोषी मिरवणूक !
schedule01 Mar 26 person by visibility 663 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : " कार्यकर्त्यांचा ओसांडून वाहणारा उत्साह, पक्षाचा झेंडा उंचावत मोठ्या आवाजात दिल्या जाणाऱ्या घोषणा, भारतीय जनता पक्षाच्या विजयाचा घोष, आणि महाडिक- महाडिक धुमधडाकाचा नारा... अशा जल्लोषी वातावरणात भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची मिरवणूक काढण्यात आली. रविवारी (एक मार्च रोजी )सायंकाळी काढण्यात आलेल्या या मिरवणुकीने शहरवासीयांचे लक्ष वेधले.
सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कावळा नाका येथील छत्रपती ताराराणी चौकातून मिरवणुकीला प्रारंभ झाला. प्रारंभी कृष्णराज महाडिक यांनी रणरागिणी ताराराणी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कृष्णराज महाडिक हे रविवारी कोल्हापुरात पोहोचले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. चार वाजल्यापासूनच कार्यकर्ते कावळा नाका येथे दाखल होत होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कार्यकर्त्यांनी चौक भरून गेला. कृष्णराज महाडिक यांच्या मिरवणुकीसाठी हाराफुलानी चारचाकी वाहनाची सजावट केली होती. यामध्ये उभे राहून कृष्णराज महाडिक या नागरिकांना अभिवादन करत होते. खासदार धनंजय महाडिक, महापौर रुपाराणी निकम, नगरसेवक प्रा. जयंत पाटील, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, भाजपचे महानगर अध्यक्ष विजय जाधव व महापालिकेतील गटनेते मुरलीधर जाधव या वाहनात होते. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मिरवणुकीचे अग्रभागी होते. दुचाकीला लावलेला पक्षाचा झेंडा आणि विजयाच्या घोषणा देत मिरवणूक काढण्यात आली. कावळा नाका, पंचशील हॉटेल, दाभोळकर चौक, गोकुळ हॉटेल मार्गे मिरवणूक पुढे मार्गस्थ मार्गस्थ झाली. कृष्णराज महाडिक यांनी मिरवणूक मार्गावरील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. दसरा चौक येथे राजर्षी शाहू महाराज, बिंदू चौक येथील महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. बिंदू चौकातून हे मिरवणूक छत्रपती शिवाजी चौकात पोहोचली. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. येथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
या मिरवणुकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांचा ओसंडणारा उत्साह दिसून आला.
मिरवणुकीत पृथ्वीराज, महाडिक विश्वराज महाडिक, जिल्हा परिषदेचे सदस्य तानाजी पाटील, नगरसेवक विशाल शिराळे, विजय देसाई, विजेंद्र माने, वंदना मोहिते, माधुरी किरण नकाते, सृष्टी करण जाधव, अर्चना उत्तम कोराने, दीपा अजित ठाणेकर, पूर्वा राणे, नगरसेवक सुनील वाडकर, माजी नगरसेवक राजसिंह शेळके, चंद्रकांत घाटगे, प्रदीप उलपे , जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेश चौगुले दिलीप पाटील कावणेकर, रविष पाटील, पाचगाव येथील महेश पाटील, संजय पाटील, प्रसाद जाधव, विवेक कोरडे , भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.