अल्पवयीन मुलांची कार स्टंटबाजी विद्यार्थिनीच्या जीवावर, चारचाकीच्या धडकेत कौलव येथील प्रज्ञा कांबळेचा मृत्यू
schedule24 Jul 25 person by visibility 77 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अल्पवयीन मुलांची कार स्टंटबाजी कॉलेज विद्यार्थिनीच्या जीवावर बेतली आहे. या अपघातात करवीर तालुक्यातील कुरुकली येथील भोगावती कॉलेजची विद्यार्थिनी प्रज्ञा दशरथ कांबळे हिचा मृत्यू झाला. कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस थांब्यावर उभे असलेल्या विद्यार्थिनींच्या घोळक्यात कार घुसून हा अपघात घडला. यामध्ये आणखी तीन विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत. गुरुवारी (२४ जुलै २०२५) ही घटना घडली. भोगावती कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तीन विद्यार्थिनी कुरुकली बस थांब्यावर घरी जाण्यासाठी उभ्या होत्या. यावेळी चार अल्पवयीन मुले स्टंटबाजी करत कार चालवित होते. बस थांब्यापासून काही अंतरावर कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. वेगाने कार, बस थांब्यावर उभ्या असलेल्या विद्यार्थिनींना धडक दिली. कारच्या धडकेत चार विद्यार्थिनी जखमी झाल्या. यापैकी कौलव येथील प्रज्ञा दशरथ कांबळे ही युवती गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी दवाखान्याकडे हलविले. पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. दरम्यान या अपघातानंतर कारमधील मुलांनी वेगाने कार पळविली. दरम्यान उपस्थित नागरिक व बस थांब्यावर उपस्थित इतर विद्यार्थ्यांन कारचा पाठलाग केला. भोगावती-ठिकपुर्ली मार्गावर कार अडविण्यात आली. यावेळी कारमधील दोघे जण पळून गेले. तर कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.