Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, कोल्हापूर - इचलकरंजीचा महापौर शिवसेनेचा करूया : कार्यकर्त्यांच्या तुडुंब गर्दीत जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटनमहापालिकेतील लाचखोरी, ठेकेदारांकडून अधिकाऱ्यांच्या नावासहित टक्केवारीची रक्कम जाहीर  !!सचिन शिरगावकर, बेस्ट इंजिनीअर ऑफ द इयर !जातीवंत म्हैस खरेदीसाठी गोकुळच्या अनुदानात वाढ ! सचिवांचे कमिशन वाढविलेसोमवारी लोकरंग पुरस्कार वितरण समारंभहॉटेल नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सिद्धार्थ लाटकर, उपाध्यक्षपदी मोहन पाटीलराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेड्रेनेज घोटाळयातील दोषींवर फौजदारीसह प्रशासकीय कारवाई होणार-आयुक्त के मंजुलक्ष्मी शिक्षण विभाग करणार शाळांची अचानक तपासणी ! तर मुख्याध्यापकांवर कारवाई !!वारणानगर इंजिनीअर अँड टेक्नॉलॉजीचा माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

जाहिरात

 

ड्रेनेज घोटाळयातील दोषींवर फौजदारीसह प्रशासकीय कारवाई होणार-आयुक्त के मंजुलक्ष्मी

schedule25 Jul 25 person by visibility 65 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ड्रेनेज पाइपाइनचे काम न करता ठेकेदाराने महापालिकेकडून ८५ लाख रुपये उचलण्याचा प्रकाराचा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या घोटाळयातील दोषीवर प्रशासकीय व फौजदारी स्वरुपाची कारवाई होईल. यातील दोषींना पाठीशी घालणार नाही अशी स्पष्ट भूमिका महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी घेतली आहे. या घोटाळयाची चौकशी करण्यासाठी दोघा अधिकाऱ्यांच्या समावेशाची चौकशी समिती नेमल्याचेही त्यांनी सांगितले.

शिवसेनेचे जिल्हा समन्वयक व माजी नगरसेवक सत्यजीत कदम यांनी ठेकेदारांकडून महापालिकेची ८५ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. ड्रेनेज लाइनचे काम न करता तब्बल ८५ लाख रुपये ठेकेदाराने उचलले आहेत हे त्यांनी निदर्शनास आणले. माजी नगरसेवक कदम यांनी उघडकीस आणलेल्या या घोटाळयामुळे महापालिका यंत्रणा हडबडली आहे. ठेकेदाराने अधिकाऱ्यांच्या खोटया सह्या करुन बिले काढल्याची कबुली दिली आहे. दुसरीकडे महापालिका प्रशासनाने या प्रकाराची प्राथमिक चौकशी सुरू केली. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी या प्रकरणी  तत्कालिन शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता रमेश कांबळे यांच्यासह आणखी एका अधिकाऱ्यांला नोटीसा काढल्या होत्या. मात्र त्या अधिकाऱ्यांनी, त्या सह्याशी आमचा काही संबंध नाही अशी बाजू मांडली. या प्रकरणी महापालिकेचे मुख्य लेखा परीक्षक कलावती मिसाळ, मुख्य वित्त व लेखाधिकारी संजय सरनाईक यांचे म्हणणेही घेतले आहे.

दरम्यान प्रशिक्षणासाठी बाहेर असलेल्या महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी या शुक्रवारी (२५ जुलै २०२५) महापालिकेत दाखल झाल्या. त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सगळया प्रकाराची माहिती घेतली. सायंकाळी पत्रकारांशी बोलताना प्रशासक मंजुलक्ष्मी यांनी, ‘ड्रेनेज पाइपलाइन घोटाळयातील दोषींना पाठीशी घातले जाणार नाही. प्राथमिक टप्प्यात पवडी विभागाचा मोठा सहभाग असल्याचे दिसून येत आहे. या साऱ्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी दोघा अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. शिवाय ठेकेदार वराळेला ब्लॅकलिस्ट करण्याची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. या प्रकरणी फौजदारीसह प्रशासकीय कारवाई केली जाणार आहे.’असे सांगितले.

...................

गेल्या पाच वर्षातील विकासकामांची थर्ड पार्टी ऑडिट करा-शिवसेना ठाकरे गटाची मागणी

महापालिकेमार्फत गेल्या पाच वर्षात झालेल्या विविध विकासकामांची थर्ड पार्टी ऑडिट करावे. महापालिकेतील भ्रष्ट साखळी उद्ध्वस्त करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने महापालिका प्रशासकांकडे केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, माजी नगरसेवक सुनील मोदी, प्रतिज्ञा उत्तुरे, महेश उत्तुरे, विशाल देवकुळे, शशिकांत बीडकर यांचा शिष्टमंडळात समावेश होता.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes