राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले
schedule25 Jul 25 person by visibility 213 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : धरणक्षेत्रात गेले काही दिवस होत असलेल्या संततधार पावसामुळे राधानगरी धरण ९५ टक्केच्या आसपास भरले आहे. या धरणाचे स्वयंचलित दोन दरवाजे शुक्रवारी (२५ जुलै २०२५) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास उघडले. तीन व सहा क्रमांकाचे दरवाजे उघडले आहेत. या दोन्ही दरवाजातून २८५६ क्युसेकस विसर्ग होत आहे. तर पॉवर हाऊसमधून १५०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. एकूण ४३५६ क्युसेक्स विसर्ग होत आहे. प्रशासनाने नदी काठच्या लोकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान पंचगंगा नदीची पाणी पातळी राजाराम बंधारा येथे २४ फूट इतकी आहे. जिल्ह्यातील बारा बंधारे पाण्याखाली आहेत. शुक्रवारी दिवसभर अधूनमधून पावसाचा जोर कायम होता