पुरुषोत्तम महाकरंडकाच्या कॉमर्स कॉलेजची ग्वाही एकांकिका द्वितीय
schedule29 Dec 25 person by visibility 25 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : पुणे येथे महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित पुरुषोत्तम महाकरंडक एकांकिका स्पर्धा – २०२५ च्या महाअंतिम फेरीत कौन्सिल ऑफ एज्युकेशन, कोल्हापूर संचलित देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सच्या सांस्कृतिक विभागाने सादर केलेल्या “ग्वाही” या एकांकिकेने द्वितीय क्रमांक पटकावले.
या यशाबरोबरच वैयक्तिक पारितोषिकांमध्येही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपली कलात्मक गुणवत्ता अधोरेखित केली. पार्थ पराग पाटणे यांना उत्कृष्ट अभिनेता, अक्षता बारटक्के यांना उत्कृष्ट अभिनेत्री तर अभिषेक महांतेष हिरेमठस्वामी यांना सर्वोत्कृष्ट अभिनय नैपुण्य हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला.
सलग दुसऱ्या वर्षी महाअंतिम फेरीत मिळालेल्या या यशामुळे कोल्हापूरची रंगभूमीवरील परंपरा अधिक भक्कम झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या यशामागे कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा रजनी मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, संचालक अॅड. वैभव पेडणेकर व अॅड. अमित बाडकर यांनी प्रोत्साहन दिले. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वर्षा मैंदर्गी आणि प्रा. प्रवीण सोरटे यांनी मार्गदर्शन केले.